प्रियंका गांधींच्या घरात घुसलेली कार कोणाची? अमित शहांनी केली खुलासा

टीम ई-सकाळ
Tuesday, 3 December 2019

नवी दिल्ली : गांधी कुटुंबाच्या विशेष सुरक्षेवरून सध्या दिल्लीत वातावरण तापलंय. त्यातच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या घरात एका गाडी घुसल्याचा आरोप करण्यात आला. सुरक्षेचं कडं तोडून ही गाडी घरात घुसली. पण, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत खुलासा करताना वेगळीच माहिती दिलीय. प्रियंका गांधी यांच्या घरात घुसलेली गाडी ही काँग्रेस नेत्याचीच होती, असं अमित शहांनी स्पष्ट केलंय. 

ताज्या बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

संबंधित बातमी - आता फक्त पंतप्रधानांना एसपीजी सुरक्षा

प्रियांकांच्या घरात कॉंग्रेसच्याच नेत्याची घुसखोरी!
कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची "एसपीजी' सुरक्षा हटविल्यानंतर 25 नोव्हेंबरला त्यांच्या घरात घुसखोरी झाल्याबाबत शहा यांनी विस्ताराने सांगितले. ते म्हणाले, 'त्यांच्या घरात केवळ गांधी घराण्याचे तिघे, रॉबर्ट वद्रा व त्यांची मुलेच थेट जाऊ शकतात. त्या दिवशी सुरक्षा यंत्रणेला सूचना मिळाली होती की, राहुल गांधी काळ्या रंगाच्या गाडीतून येत आहेत. त्याच वेळी एक काळी गाडी आली व ती थेट आत गेली. त्यात कॉंग्रेसच्या नेत्या शारदा त्यागी होत्या. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरू असून, तीन सुरक्षा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.' शहा म्हणाले, की "एसपीजी'च्या ताफ्यात 33 टक्के जवान सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ), 33 ते 34 टक्के केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ), 17 टक्के केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ), नऊ टक्के भारत-तिबेट सीमा पोलिस दलाचे (आयटीबीपी) व अन्य राज्यांच्या पोलिस दलांचे एक टक्का जवान असतात. त्यांचे रीतसर प्रशिक्षण केले जाते. दर पाच वर्षांनी त्यांना बदलले जाते. राजीव गांधी यांना पर्यायी सुरक्षा न देताच त्यांची "एसपीजी' काढल्याचा ठपका वर्मा आयोगाने ठेवला होता; आम्ही तसे केलेले नाही. 

शारदा त्यागी काय म्हणतात?
या संदर्भात काँग्रेस नेत्या शारदा त्यागी यांनी एएनआय वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणल्या, 'मला प्रियंका गांधी यांच्या निवासस्थानाचा क्रमांक माहिती नव्हता. मी जेव्हा त्यांच्या घराजवळ गेले. तेव्हा लगेच बॅरेकेट्स हटविण्यात आले. सुरक्षा रक्षकांनी गाडीत कोण बसलंय किंवा नाही, हे पाहण्याची तसदी घेतली नाही.'

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: home minister amit shah statement on priyanka gandhi security at residence