जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही: राजनाथसिंह

वृत्तसंस्था
सोमवार, 1 जानेवारी 2018

काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कॅम्पवर दहशतवाद्यांनी शनिवारी रात्री हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवान हुतात्मा झाले. तर, तीन जवान जखमी आहेत.

नवी दिल्ली - दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पाच जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.

काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कॅम्पवर दहशतवाद्यांनी शनिवारी रात्री हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवान हुतात्मा झाले. तर, तीन जवान जखमी आहेत. वर्षाच्या शेवटी हा हल्ला झाल्याने देशभर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

राजनाथसिंह यांनी आज उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे आयटीबीपी परिसराची पाहणी केली. यावेळी बोलताना राजनाथसिंह म्हणाले, की पुलवामातील सीआरपीएफ कॅम्पवर झालेल्या हल्ल्याची मी कठोर शब्दांत निंदा करतो. आम्ही हुतात्मा जवानांच्या कुटुंबासमवेत आहोत. या हल्ल्याने पूर्ण देशाला दुःख झाले आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला आम्ही सडेतोड उत्तर देऊ. 

Web Title: home minister rajnath singh statement on terrorist attack