गाड्या सोडण्याविषयी गृहमंत्रालयाने दिले स्पष्टीकरण; काय ते वाचा सविस्तर

मुंबई - परप्रांतीय कामगारांनी मंगळवारी आपआपल्या घरी परत जाण्यासाठी वांद्रे टर्मिनसबाहेर गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा असा बोजवारा उडाला.
मुंबई - परप्रांतीय कामगारांनी मंगळवारी आपआपल्या घरी परत जाण्यासाठी वांद्रे टर्मिनसबाहेर गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा असा बोजवारा उडाला.

नवी दिल्ली - श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे केंद्रीय गृह मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय यांनाच असतील असे गृहमंत्रालयाकडून आज स्पष्ट करण्यात आले असून या परिपत्रकाच्या प्रती सर्व राज्यांना तसेच विविध मंत्रालयांनाही पाठविण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील सूचना पत्रकात या गाडीने प्रवास करणाऱ्यांसाठीच्या अत्यावश्‍यक व अनिवार्य अटींची माहितीही देण्यात आली आहे.

त्रास कमी करण्यासाठी सूचना
केंद्रीय गृहसचिवांनी काल राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून रस्त्याने चालत निघालेल्या स्थलांतरितांचा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार हे स्थलांतरित ज्या राज्यात असतील त्या राज्यांनी त्यांच्या भोजनाची तसेच अन्य आरोग्यविषयक सुविधा पुरविण्याची, त्यांच्या विश्रांतीबरोबरच त्यांना तेथेच थांबवून त्यांच्या पुढील प्रवासासाठी बसगाड्या किंवा अन्य साधनांची व्यवस्था करण्याच्या सूचना  देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रसंगी स्वयंसेवी संघटनांची मदत घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

मंत्रालयाच्या नव्या अटी -

  • गाड्या सोडण्यासाठी रेल्वे मंत्रालय हे केंद्रीय गृह मंत्रालयाबरोबर सल्लामसलत करेल
  • अडकलेल्या कामगारांची राज्यांनी व्यवस्था करावी
  • राज्यांनी नोडल अधिकारी नेमून समन्वय साधावा
  • गाड्यांचे वेळापत्रक, थांबे यांची आखणी राज्यांशी सल्लामसलत करून केली जाईल
  • लक्षणे नसणाऱ्यांनाच गाडीतून प्रवास शक्य
  • वेळापत्रक, सुविधा, तिकीट व्यवस्था यांची माहिती रेल्वे मंत्रालय जाहीर करेल
  • प्रवासातही सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागणार
  • प्रवाशांना ज्या स्थानकावर उतरायचे तेथील आरोग्य अटी पाळाव्या लागणार

परप्रांतीय मजुरांवर काळाचा घाला; चौघांचा मृत्यू : २६ जखमी 
आर्णी (जि. यवतमाळ) - झारखंड येथील परप्रांतीय मजुरांना सोलापूरवरून नागपूरला घेऊन निघालेल्या बसचालकाला डुलकी आली. त्यामुळे भरधाव बस टिप्परवर आदळल्याने  चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांत बसचालकासह तिघांचा समावेश आहे. या  अपघातात २६ जण जखमी झाले. ही घटना मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास आर्णी तालुक्‍यातील कोळवणजवळ घडली. बसचालक सुनील दगडू शिंदे (वय ५५, रा. उळे, जि. सोलापूर), अनुज मांजी (वय ३०, रा. करमकला), सुनीता शिवा साहू (वय ३५, रा. पथरिया), शशिकला संतोष यादव (वय ३५, रा. पथरिया), अशी मृतांची नावे आहेत. तसेच २६ जण जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपचारासाठी आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी उदयसिंग चंदेल, उपविभागीय अधिकारी बक्षी, तहसीलदार धीरज स्थूल, ठाणेदार यशवंत बाविस्कर, सपोनि विशाल खलसे,नागेश जायले आदींनी तत्काळ घटनास्थळ गाठले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com