गृहमंत्रालयाचे संकेतस्थळ हॅक

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

मागील चार वर्षांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारची सातशे पेक्षाही अधिक संकेतस्थळे हॅक झाली.

नवी दिल्ली : अज्ञात हॅकर्सनी आज गृहमंत्रालयाचे संकेतस्थळ हॅक केल्यानंतर देशाच्या सुरक्षा यंत्रणा हादरल्या; आज सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर "नॅशनल इन्फॉर्मेटिक्‍स सेंटर'च्या तज्ज्ञांनी तातडीने हे संकेतस्थळ बंद करत या घटनेची चौकशी सुरू केली, असे गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान गृहमंत्रालयाचे संकेतस्थळ हॅक होण्याची ही पहिलीच घटना नसून याआधीही अनेकदा हॅकर्संनी या संकेतस्थळावर हल्ले केले आहेत. मागील चार वर्षांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारची सातशे पेक्षाही अधिक संकेतस्थळे हॅक झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 

Web Title: home ministry's website hacked