समलैंगिक संबंधामुळे एड्सच्या प्रमाणात वाढ होईल : सुब्रमण्यम स्वामी

Homosexuality will increase the proportion of AIDS says Subramaniam Swamy
Homosexuality will increase the proportion of AIDS says Subramaniam Swamy

नवी दिल्ली : समलैंगिक संबंध कलम 377 बाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी याबाबत वादग्रस्त केले. ''परस्परसंमतीने ठेवलेल्या लैंगिक संबंधांमुळे समाजात वाईट गोष्टींच्या प्रमाणात वाढ होईल. समलैंगिक संबंधामुळे एड्सच्या प्रमाणात वाढ होईल'', असे सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले. 

समलैंगिक संबंध गुन्हा नाही, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. या निर्णयाचे 'एलजीबीटी'कडून स्वागत करण्यात येत आहे. असे असताना आता सुब्रमण्यम स्वामी यांनीही या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, समलैंगिकता 'जेनेटिक डिसऑर्डर'ची समस्या आहे. त्यामुळे लैंगिक संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. परस्परसंमतीने ठेवलेल्या लैंगिक संबंधांमुळे समाजात वाईट गोष्टींच्या प्रमाणात वाढ होईल. यामुळे देशात एचआयव्ही एड्सच्या प्रमाणात वाढ होईल, असे स्वामी म्हणाले. तसेच याबाबतचा निर्णय सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडून पुन्हा बदललाही जाऊ शकतो, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, समलैंगिक संबंधाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर विविध समाजातील धर्मगुरुंनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता स्वामी यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली.   

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com