
एका तरुणाला आंतरजातीय प्रेमविवाहाची किंमत स्वतःच्या जीवाला गमवून चुकवावी लागली आहे. त्याच्या प्रेमाचा इतका भयानक अंत झाला की मेहुण्यांनी त्याचे डोके ठेचून त्याची हत्या केली. बहिणीने प्रेमविवाह केल्याने भावांचे लग्न जमत नव्हते या रागातूनच मुलीच्या भावांनी दाजीची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना राजस्थानमधील जयपूरमध्ये घडली.