UP Forced Labour: उत्तर प्रदेशात ‘छळछावणी’ उघडकीस! बारा वेठबिगार मजुरांची सुटका; छळामुळे गेल्यावर्षी एकाचा मृत्यू, एकाच धाडस अन्..

Human trafficking and forced labour case in UP: चांगल्या पगाराचे आमिष दाखवून मजुरांना कारखान्यात डांबून अमानुष छळ; मारहाण, उपासमार, पळून जाण्यास अडथळे आणि मृतदेहाची गुप्त विल्हेवाट उघडकीस
Illegal Labour Camp Unearthed in Uttar Pradesh; 12 Rescued, Probe Intensifies

Illegal Labour Camp Unearthed in Uttar Pradesh; 12 Rescued, Probe Intensifies

sakal

Updated on

मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश): जर्मनीचा हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरने उभारलेल्या छळ छावण्यांची वर्णने विविध माध्यमांतून ऐकलेली असतानाच उत्तर प्रदेशात त्याच्या अत्याचाराची आठवण करून देणारी ‘छळछावणी’ उघडकीस आली आहे. चांगल्या पगाराची नोकरी, मोफत निवास आणि जेवणाचे आमिष दाखवून विविध राज्यांतील मजुरांना एका कारखान्यात आणण्यात आले. मात्र, तेथे त्यांना वेठबिगार म्हणून डांबून ठेवत अमानुष छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बारा मजुरांची सुटका करण्यात आली असून, त्यापैकी एका मजुराचा छळामुळे मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह पोत्यात भरून विल्हेवाट लावण्यात आल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी कारखान्याच्या मालकासह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com