'कोरोना करी’ आणि ‘मास्क नान’चा अहवाल पॉझिटिव्ह...

hotel corona curry and mask nan eaters responded positively
hotel corona curry and mask nan eaters responded positively

जोधपूर (राजस्थान): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनावर लस तयार करण्यात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोरोना हा शब्द प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळतो. याचा फायदा घेत हॉटेलधारकांनी 'कोरोना करी’ आणि ‘मास्क नान’ पदार्थ तयार केले आहेत. खवय्यांचा या पदार्थांना प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

जगभरात कोरोनावरुन नवनव्या कल्पना लढवल्या जात आहे. काहींनी कोरोना विषाणूचा पोशाख तयार केलाय तर काहींनी आपल्या जन्मजात मुलांची नाव कोरोनावरुन ठेवली. काहींनी कोरोनाची वाहने रस्त्यावर आणली. एकीकडे कोरोनाची भीती असताना दुसरीकडे खवय्ये कोरोना करीवर ताव मारताना दिसत आहेत. हॉटेलधारक कोरोना व्हायरस थीमवर खाद्य पदार्थ तयार करू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी मजुराईच्या एका हॉटेलमधील मास्क पराठा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता या यादीत जोधपूरच्या रेस्टॉरंटच्या नावाचा समावेश झाला आहे.

हॉटेलमध्ये पूवी तयार केल्या जाण्याऱया पदार्थांनाच कोरोनाची नावे देऊन त्या प्रमाणे सजवून दिली जातात. मलाई कोफ्त्याला विषाणूच्या रुपात तयार करण्यात आले असून, याची किंमत 220 रुपये तर मास्क नानची किंमत 40 रुपये आहे. शुद्ध शाकाहारी खाणाऱ्यांची संख्या वाढण्यासाठी हा प्रयोग असून, कोरोना संक्रमणाबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण केली जात आहे, असे हॉटेल चालकांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com