घराचे सुशोभीकरण आता "एका क्‍लिक'वर

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

इंटरनेटमुळे नव्या संकल्पनांना प्रत्यक्षात आणणे अधिक सोपे झाले आहे. शिवाय या प्रक्रियेसाठी वेळदेखील कमी लागतो. हल्ली मोठ्या शहरांमध्ये राहणारी मंडळी घराच्या सजावटीबाबत चोखंदळ दिसून येतात. या मंडळींना केवळ सर्चिंगच्या माध्यमातून घरासाठी चांगल्या डिझाइन निवडणे शक्‍य होते, असे "रिनोमानिया' या ऑनलाइन पोर्टलच्या सहसंस्थापक रितू मल्होत्रा यांनी सांगितले

नवी दिल्ली - आधुनिक संगणकीय तंत्रज्ञानामुळे ई-कॉमर्सची दारे सर्वांसाठी खुली झाली असून, अगदी जीवनावश्‍यक वस्तूंपासून ते घराच्या सुशोभीकरणापर्यंतची अवघड कामेही आता एका क्‍लिकर आली आहेत. यंदाच्या दिवाळीचा मुहूर्त साधून अनेक नेटिझन्सनी घराच्या सुशोभीकरण आणि नूतनीकरणासाठी पोर्टल आणि संकेतस्थळांचा आधार घेतल्याचे दिसून येते.

बऱ्याच मंडळींनी होम डेकोरेशनसाठी पारंपरिक पद्धतीने सुतारांचा वापर न करता "ऑनलाइन सर्चिंग'ला प्राधान्य दिले आहे. इंटरनेटमुळे नव्या संकल्पनांना प्रत्यक्षात आणणे अधिक सोपे झाले आहे. शिवाय या प्रक्रियेसाठी वेळदेखील कमी लागतो. हल्ली मोठ्या शहरांमध्ये राहणारी मंडळी घराच्या सजावटीबाबत चोखंदळ दिसून येतात. या मंडळींना केवळ सर्चिंगच्या माध्यमातून घरासाठी चांगल्या डिझाइन निवडणे शक्‍य होते, असे "रिनोमानिया' या ऑनलाइन पोर्टलच्या सहसंस्थापक रितू मल्होत्रा यांनी सांगितले. आधुनिक थ्री-डी तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना प्रत्यक्ष सजावटीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच पूर्ण घराचा चित्रमय आराखडा समजू शकतो. यामुळे ग्राहकांना या डिझाइनमध्ये ऐन वेळी काही बदल करणेही शक्‍य होईल.

टुलमुळे कलात्मकता
"अर्बन लॅडर'सारख्या इंटिरियर डिझाइन टुलमुळे घरामध्ये नेमक्‍या कोणत्या ठिकाणी फर्निचर मांडावे किंवा ते मांडू नये, हे अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकते. हा टुल थेट गुगल कार्ड बोर्डशी कनेक्‍ट होत असल्याने ग्राहकांना थेट खोलीचे अंतरंग पाहणेही शक्‍य होते. बऱ्याचदा घराचे सुशोभीकरण करणारा सुतार किंवा अन्य कारागीर तितकासा कल्पक नसतो; पण केवळ तंत्रज्ञानाच्या ताकदीने आपल्याला हवे तसे घराचे सुशोभीकरण करता येते.

Web Title: house designing through e commerce