Children Died : पावसामुळे कोसळली घराची भिंत; ७ मुले ढिगाऱ्याखाली दबली, दोघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

uttar Pradesh Crime news

पावसामुळे कोसळली घराची भिंत; ७ मुले ढिगाऱ्याखाली दबली, दोघांचा मृत्यू

अलिगड : बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत (Wall Collapsed) पावसामुळे कोसळल्याने सात मुले ढिगाऱ्याखाली दबली गेली. यात दोन मुलांचा घटनास्थळीच मृत्यू (Died) झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. सध्या सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील अलिगड जिल्ह्यातील हुसेनपूर शहजादपूर परिसरात शनिवारी (ता. ३०) दुपारी घडली.

हुसैनपूर शहजादपूर येथे घर बांधले जात आहे. जवळच शाळेतून परतलेली मुलं घरी जात असताना अचानक बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळली (Wall Collapsed). कोणाला समजेपर्यंत ७ निष्पाप मुलं ढिगाऱ्याखाली दबले गेले. हे पाहून स्थानिक नागरिकांनी घाईघाईने ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले व पोलिस प्रशासनाला माहिती दिली.

हेही वाचा: इराणींनीही केला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूचा अपमान; चौधरींचा पलटवार

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस-प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची मदत घेत जेसीबीने मलबा हटवून मुलांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत दोन मुलांचा मृत्यू (Died) झाला होता. त्याचबरोबर अपघातात जखमी झालेल्या पाच मुलांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. यानंतर त्यांना अलिगड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. सध्या जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

सर्वतोपरी प्रयत्न केले जातील

गावातील १० ते १२ वर्षांची मुले दुपारी तीन वाजताच्या सुमारास घरी परतत होते. दरम्यान, मुसळधार पाऊस सुरू झाला. गावात पोहोचल्यावर सात मुलं बांधकाम सुरू असलेल्या घराच्या भिंतीजवळून जात होती. यादरम्यान भिंत कोसळून सात मुले भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. पीडित कुटुंबाला जिल्हा प्रशासन आणि सरकारकडून मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे एसडीएम रविशंकर सिंह म्हणाले.

Web Title: House Wall Collapsed Heavy Rain Childrens Died Uttar Pradesh Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..