
स्मार्टफोनने वाचवले युक्रेनी सैनिकाचे प्राण
मुंबई : मृत्यूशी झुंजणाऱ्या एका युक्रेनी सैनिकाची चित्रफीत सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. ऐन युद्धाच्या धामधुमीत एका छोट्याशा मोबाईल फोनमुळे सैनिकाचे प्राण वाचताना दिसत आहेत. सैनिकाच्या दिशेने झाडली गेलेली गोळी या फोनने आपल्या अंगावर झेलली आणि सैनिक वाचला.
हेही वाचा: रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला फटका, S-400 क्षेपणास्त्राची डिलीव्हरी लांबली
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध भडकल्यानंतर धैर्य आणि शौर्याची जी उदाहरणे समोर येत आहेत त्यापैकीच एक म्हणजे ही चित्रफीत आहे. एका युक्रेनी सैनिकावर रशियन सैनिकांनी गोळी झाडली; मात्र ही ७.६२ मिमीची गोळी युक्रेनी सैनिकाला लागण्यापूर्वीच त्याच्या स्मार्टफोनमध्ये जाऊन अडकली. स्मार्टफोन दाखवत सैनिक म्हणतो आहे, "स्मार्टफोनने माझे प्रमाण वाचवले".
हेही वाचा: रशिया-युक्रेन युद्ध संपल्यानंतर महागाई कमी होण्याचे संकेत
रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाचा दुसरा महिना सुरू झाला असून हे युद्ध संपण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत आणि अशावेळी ही चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. ही चित्रफीत त्या सैनिकानेच बनवली असून तो आपल्या सहकाऱ्याला घडलेला प्रसंग आनंदाने सांगताना दिसत आहे.
डन्टान्स्क आणि लुहान्स्क या देशांनी युक्रेनी सैन्यापासून बचावासाठी मदत मागितल्यानंतर २४ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनमध्ये विशेष लष्करी मोहीम हाती घेतली. या मोहिमेंतर्गत केवळ युक्रेनी सैनिकांना लक्ष्य केले जात असून सामान्य नागरिकांना कोणताही धोका नाही, असा दावा रशियातर्फे केला जात आहे; मात्र हा दावा अमान्य करत पाश्चात्य देशांनी मॉस्कोवर निर्बंध लादले आहेत.
Web Title: How A Smartphone Saved A Soldiers Life In Ukraine Rasia War
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..