Sayajirao Gaikwad III
Sayajirao Gaikwad IIIesakal

Sayajirao Gaikwad III: कसं बनलं बडोदा बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवासाचा अविभाज्य भाग?

उपकारांची परतफेड त्याबद्दलची जाणीव ठेवून कृतज्ञता व्यक्त करूनच करता येते...

Dr. Babasaheb Ambedkar: बडोद्याचे शासक तिसरे सयाजीराव गायकवाड यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कारकीर्दीमध्ये अन् जडणघडणीमध्ये खूप मोलाचा वाटा आहे, ०६ फेब्रुवारी १९३९ मध्ये त्यांचा मृत्यू झाला पण त्यांनी आपल्याला केलेल्या मदतीबद्दल आंबेडकरांना कृतज्ञता व्यक्त करायची होती अन् त्यासाठी ११ वर्षांनी १९५० मध्ये त्यांनी सयाजीरावांच्या वंशाजांशी पत्रव्यवहार केला. 

Sayajirao Gaikwad III
बाबासाहेब आंबेडकरांचे १० प्रेरणादायी विचार

हा होता पत्राचा मजकूर 

आंबेकरांनी १० ऑक्टोबर १९५० मध्ये तत्कालीन राज्यकर्ते प्रतापरावसिंह गायकवाड यांच्याशी चार पानी हस्तलिखित पत्राने संवाद साधत सयाजीरावांवर काहीतरी लिहिण्याची इच्छा नोंदवली. आंबेडकर पत्रात म्हणतात, 

“मी त्यांच्या कृतज्ञतेचा ऋणी आहे. मी कितीही ठरवलं तरी याची परतफेड करू शकत नाही, त्याबदल्यात त्यांच्या जीवनावर लिहिणे ह एकमेव मार्ग आहे. ते माझे संरक्षक आणि माझ्या भाग्याचे शिल्पकार आहेत, त्यांच्यामुळे आज मी उच्च शिक्षण घेऊ शकलो जर तेव्हा त्यांनी मला मदत केली नसती तर मी आज जिथे उभा आहे तिथे कधीच उभा राहिलो नसतो.

Sayajirao Gaikwad III
Dr. Babasaheb Ambedkar Quotes : बाबासाहेबांचे हे विचार नक्कीच तुमच्या जीवनात परिवर्तन घडवतील

आंबेडकरांच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे ही इच्छा अपूर्ण राहिली, पण आंबेडकरांचे हे मत अगदी ठाम होते की उपकारांची परतफेड त्याबद्दलची जाणीव ठेवून कृतज्ञता व्यक्त करूनच करता येते.

Sayajirao Gaikwad III
Dr. Babasaheb Ambedkar : नाशिक रोडला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींचे जतन

अशी केलेली मदत 

सयाजीरावांनी आंबेडकरांना बॉम्बेच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकण्यासाठी दरमहा २५ रुपये दिले. नंतर, कोलंबिया विद्यापीठात राहण्यासाठी, दर महिन्याला £11.5 दिले. आंबेडकरांनी अर्थशास्त्रात स्पेशलायझेशनसह कला शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतले. नंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही शिक्षण घेतले.

Sayajirao Gaikwad III
Mahaparinirvan Diwas 2022 : डॉ. बाबासाहेबांना असा मिळाला शाळेत प्रवेश | Babasaheb | Sakal

मुलींचे शिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन आणि विधवा पुनर्विवाह या चळवळीतील सयाजीराव कायम पुढे असायचे. सर्व शिकले तरच प्रगती होईल यावर त्यांच्या ठाम विश्वास होता. आंबेडकरांना आपल्या चळवळीत मदत करण्यासाठी त्यांनी आर्य समाजाचे सदस्य आत्माराम अमृतसरी यांना पंजाबमधून बोलावले, ते आंबेडकरांना वैयक्तिकरित्या मदत करत करत होते. त्याकाळी दलितांसाठी शाळा नव्हत्या तेव्हा सयाजीरावांनी त्यांच्यासाठी वेगळ्या शाळा काढल्या होत्या.  

Sayajirao Gaikwad III
Dr. Babasaheb Ambedkar यांचा पुतळा का हटवला?

आंबेडकर बडोद्याला वास्तव्याला असतांना... 

आंबेडकरांचा बडोद्यातील कार्यकाळ दोन भागात विभागला गेला होता; एक मुंबईत शिक्षण घेतल्यानंतर आणि दुसरा परदेशातून परतल्यानंतर. बडोद्याच्या सैन्यात पहिला कार्यकाळ फक्त दोन दिवसांचा होता कारण त्यांना आपल्या आजारी वडिलांची काळजी घेण्यासाठी मुंबईला परतावे लागले. दुसरा एका महिन्यापेक्षा जास्त होता पण त्यात त्यांना सतत भेदभावामुळे त्रास सहन करावा लागला होता. 

Sayajirao Gaikwad III
सयाजीराव महाराजांचं स्मारक म्हणून कर्मवीरांनी हायस्कूल उभारलं होतं

आंबेडकरांना मराठे आणि ब्राह्मणांचे संरक्षण असलेल्या क्लबमध्ये जाण्याची परवानगी नव्हती, जिथे राहायला होते तिथे त्यांना आपली ओळख बदलून राहावं लागलं होतं, आंबेडकरांना जातीय पात्रात पाणी दिले जात नव्हते, त्यांच्यासमोर फाइल्स टाकल्या जायच्या असे काहींचे म्हणणे आहे. 

Sayajirao Gaikwad III
सयाजीराव गायकवाड यांच्या पुण्यतिथीचा जिल्हा परिषदेला विसर 

सयाजीरावांना आंबेडकरांबद्दल कितीही स्नेह असला तरी ते काही ठिकाणी हतबल होत, सत्ता चालव त्यांना असंतोष वाढवायचा नव्हता, परिस्थिती संवेदनशील होती आणि त्यांनी आंबेडकरांना धीर धरण्यास सांगितला. सयाजीरावांनी आंबेडकरांना शिष्यवृत्ती दिली या वस्तुस्थितीवरून ते संपूर्ण परिस्थितीकडे कसे पाहतात हे दिसून येते. 

Sayajirao Gaikwad III
सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुर्नगठन

गुजरात सरकारचा मोठा निर्णय 

आंबेडकरांचा बडोद्याशी संबंध जतन करण्यासाठी, गुजरात सरकारने २०१५ मध्ये १० कोटी रुपयांच्या प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यात ३,८०० चौरस मीटर पेक्षा जास्त मोठ्या आकाराचे स्मारक समाविष्ट होते, इथेच आंबेडकरांनी समानतेसाठी लढण्याची शपथ घेतली होती. डिजिटल प्रदर्शन आणि अॅम्फीथिएटरचाही समावेश असलेला हा प्रकल्प पूर्णत्वाच्या जवळ आहे.

Sayajirao Gaikwad III
Republic Day : 'संविधान जाळणारा मी पहिला असेन', असं डॉ. आंबेडकर का म्हणाले होते ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com