Pune Sextortion: अवघी 2 हजार लोकसंख्या असलेलं राजस्थानातील 'हे' गाव कसं करतं सेक्सटॉर्शन?

पुण्यात घडणाऱ्या याच सेक्सटॉर्शन च्या घटनांचे राजस्थान कनेक्शन पुन्हा समोर आले आहे.
Pune Sextortion cases
Pune Sextortion casesSakal

Pune Sextortion Cases: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सेक्सटॉर्शनच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहेत. अल्पवयीन तरुणांना सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकवून लाखो रुपयांची धमकी देऊन आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत.

पुण्यात घडणाऱ्या याच सेक्सटॉर्शन च्या घटनांचे राजस्थान कनेक्शन पुन्हा समोर आले आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.

पुण्यातील धनकवडी परिसरात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात महिलेचा व्हॉटसॲप डिपीचा वापर करून मोबाईलद्वारे एका युवकाला संपर्क करीत न्यूड व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याच्या धमकीमुळे एका तरुणाने आत्महत्या केली होती.

याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आणि याचे सूत्र पोहचले थेट राजस्थान मध्ये. पोलिसांनी राजस्थान मध्ये ८ दिवस थांबत रायपूर सुकेती या गावातून एका आरोपीला अटक केली.

हेही वाचा - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

याआधी पुण्यातील दत्तवाडी पोलिसांनी सेक्सटॉर्शन च्या प्रकरणात ज्या आरोपीला अटक केल होतं तो आरोपी देखील राजस्थान मधील अलविरा गावातील होता आणि त्याठिकाणी देखील अख्खं गाव हे अशा घटनेत पुढे होतं.

आता देखील या सुकेती गावात जाऊन सहकारनगर पोलिसांनी ज्याला अटक केली आहे ते संपूर्ण गाव सेक्सटॉर्शन चे रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून तुम्हाला जमतरा या वेब सिरीज ची आठवण नक्की येईल.

विशेष बाब म्हणजे या सूकेती गावातील लोकसंख्या ही २२०० असून या गावातील सर्वच लोक हे सेक्सटॉर्शन च्या घटनेत नागरिकांची फसवणूक करतात हे या प्रकरणातून समोर आलंय. विशेष बाब म्हणजे आरोपी तसेच गावातील लोक हे अशिक्षित असून अख्ख गाव अश्या घटनेमध्ये पुढे आहे.

Pune Sextortion cases
Video : जेलमधून सुटला पण न्यायला कुणीच आलं नाही; पोलीस अधिकाऱ्याने केलं...

गेल्या १ वर्षात पुणे सायबर पोलीस विभागाकडे सेक्सटॉर्शन चे तब्बल १४०० अर्ज दाखल आहेत. याच पुण्यात दोन तरुणांनी सेक्सटॉर्शन च्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती.

त्यामुळे तरुणांनो सोशल मीडियाचा वापर करताना खबरदारी बाळगा. अनोळखी व्यक्तीशी ओळख करताना विचार करा नाहीतर तुम्ही देखील या sextortion च्या जाळ्यात अडकाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com