esakal | मोहन भागवतांचं धर्मांतरावरुन मोठं वक्तव्य; म्हणाले, 'लग्नासाठी धर्मांतर करणाऱ्या मुली...'
sakal

बोलून बातमी शोधा

Mohan Bhagawat

भागवतांचं धर्मांतरावरुन मोठं वक्तव्य; म्हणाले, 'लग्नासाठी धर्मांतर करणाऱ्या मुली...'

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : संघ प्रमुख मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा धर्मांतरणासंबंधी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. हिंदूंनी आपल्या मुलांना धर्माचा आदर करायला शिकवलं पाहिजे जेणेकरुन ते दुसऱ्या धर्मात जाणार नाही. यासोबतच त्यांनी म्हटलंय की, समाज शैलीमध्ये परिवर्तन केल्यास भारत पुन्हा एकदा विश्वगुरु बनू शकतो.

हेही वाचा: काश्मीरमध्ये चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा; सुरक्षादलाला यश

भागवत यांनी काल रविवारी उत्तराखंडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ही वक्तव्यं केली आहेत. परिवार प्रबोधन कार्यक्रमामध्ये भागवतांनी हिंदू धर्म, परिवार, संस्कार आणि धर्मांतरासंबंधी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की, लग्नासाठी दुसरा धर्म स्विकारणारे चूक करत आहेत. छोट्या स्वार्थासाठी हे सगळं घडत आहे. याचं कारण कुटुंबामध्ये मुलांना आपल्या धर्माबद्दल तसेच परंपरांबद्दल आदर करणे शिकवलं जात नाही.

पुढे भागवतांनी म्हटलंय की, यांची मते बदलतात तरी कशी? आपल्या घरातील मुली दुसऱ्यांच्या विचारांच्या कशा बनतात? लहान-सहान स्वार्थासाठी अथवा लग्न करण्यासाठी धर्मांतर करणारे चुकीचे आहे. आपल्या मुलांवर आपण संस्कारच करत नाहोयत का? असा प्रश्न त्यांनी विचारलाय.

हेही वाचा: तालिबान काय म्हणतंय यावर नाही तर काय करतंय यावरुन होईल निर्णय : US

उत्तराखंडमधील हल्द्वानीमध्ये त्यांनी RSS कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांना संबोधित करताना ही वक्तव्ये केली आहेत. त्यांनी म्हटलं की, आपल्याला यासंदर्भात मुलांवर संस्कार केले पाहिजेत. त्यांना धर्माप्रती आदर, अभिमान शिकवायला हवा. RSS चा उद्देश समाजाचे संघटन करणे हे आहे, मात्र, जेंव्हा आपण RSS च्या कार्यक्रमाचं आयोजन करतो तेव्हा आपल्याला केवळ पुरुषच दिसून येतात. जर आपण संपूर्ण समाजाचं संघटन करु इच्छित आहोत, तर यामध्ये 50 टक्के महिला देखील असायला हव्यात.

RSS प्रमुखांनी आई-वडिलांना ओटीटी प्लॅटफॉर्मपासून देखील सावधान राहण्याची आवश्यकता असण्यावर जोर दिला आहे. त्यांनी म्हटलंय की, ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारच्या गोष्टी दाखवल्या जातात. मीडियामध्ये जे येतं ते आपल्या मुलांसाठी आणि आपल्या मूल्य प्रणालीसाठी चांगलं आहे की वाईट ते दाखवलं जात नाही. आपल्याला आपल्या मुलांना घरी काय पाहिलं पाहिजे आणि काय नाही, हे शिकवलं पाहिजे.

loading image
go to top