
भारतीय लढाऊ विमानांनी काल रात्री उशिरा ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. भारताने पाकिस्तानी हवाई हद्द ओलांडल्याशिवाय पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर हे हल्ले केले. या अचूक हल्ल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या लाँच पॅड आणि मुख्यालयांना लक्ष्य करण्यात आले. जेव्हा भारताने हे हल्ले केले तेव्हा पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ ठिकाणी मोठ्या संख्येने दहशतवादी उपस्थित होते.