Harish Salve : एकनाथ शिंदेंची बाजू मांडणारे वकील हरीश साळवे फी किती घेतात? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

How much does lawyer Harish Salve charge for Eknath Shinde maharashtra politics

एकनाथ शिंदेंची बाजू मांडणारे वकील हरीश साळवे फी किती घेतात?

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा आता एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. शिवसनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता या कायदेशीर लढाईत एकनाथ शिंदेंच्या बाजूने जगप्रसिद्ध वकील हरीश साळवे (Harish Salve) बाजू लढवणार आहे. तर महाविकास आघाडीच्या वतीने कपिल सिब्बल आणि मनु सिंघवी बाजू लढवणार आहे. आता सामान्य लोकांना प्रश्न पडतोय की, हरीश साळवे या वकिलाची फी किती आहे?

हरीश साळवे यांचे नाव जगातील सर्वांत मोठ्या वकिलांमध्ये गणले जाते. गेल्या वर्षी हरीश साळवे यांनी कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकिली केली होती. या प्रकरणात त्यांनी फक्त १ रुपया फी घेतली होती. पण इतर वेळेस ते फक्त एकदम मोठ्या अशाच केसेसच घेतात आणि त्यात ते प्रत्येक तासाला काही लाख तर एका दिवसासाठी २५ ते ३० लाख रुपये फी घेत असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

हरीश साळवे यांचे नाव केवळ देशातच नाही तर जगातील सर्वांत मोठ्या वकिलांमध्ये घेतले जाते. धुळे जिल्ह्यातील वरुड गावात जन्म झालेल्या हरीश साळवे यांनी नागपूर विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतले. साधारण १९८० मध्ये त्यांनी वकिलीला सुरुवात केली. १९९२ या वर्षात हरीश साळवे यांची दिल्ली उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचा: शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत ठरलं; 'राऊत को टाईट करो'

वकिली ही साळवे कुटुंबाची परंपराच आहे. त्यांचे आजोबा, पणजोबा हे नामांकित वकील होते. त्यांचे वडील नंदकुमार पी. साळवे चार्टर्ड अकाउंटंट होते आणि इंदिरा गांधी-राजीव गांधी-नरसिंह राव यांच्या कारकि‍र्दीत केंद्रीय मंत्री होते.

हरीश साळवे वकिली करण्यापूर्वी चार्टर्ड अकाउंटंट होते. नानी पालखीवाला आणि सोली सोराबजी या कायदे पंडितांच्या हाताखाली अनेक वर्षे त्यांनी काम केले आहे. इतर वकिलांप्रमाणेच हरीश साळवे हे कोणत्याही परिस्थितीत न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने येईलच याची हमी देत नसले, तरी ते रोज लाखो रुपये आरामात कमावतात. त्यांना याआधी सलमान खान, मुकेश अंबानी, इटली सरकार आणि वोडाफोन सारख्या क्षेत्रातील बड्या लोकांसाठी काम केले आहे.

हेही वाचा: बंडखोरांनी सरकारचा पाठिंबा काढताच ठाकरेंचा दणका, खात्यांचं फेरवाटप

Web Title: How Much Does Lawyer Harish Salve Charge For Eknath Shinde Maharashtra Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top