शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत ठरलं; 'राऊत को टाईट करो'

महाराष्ट्राविरोधी कारवायांसाठी काही विरोधक एकत्र आले आहेत.
Sanjay Raut on
Sanjay Raut on esakal

मुंबई : एकीकडे राज्यातील बंडखोरांचं प्रकारण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेले असताना शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं विधान केले आहे. महाराष्ट्राविरोधी कारवायांसाठी काही विरोधक एकत्र आले आहेत. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी मला मौदानात उतरावे लागले असून, महाराष्ट्रविरोधी काही लोकांची वडोदऱ्यामधील बौठक पार पडली त्यात माझ्या विरोधातील कारवाई अधिक कडक करण्याचे निश्चित करण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. (Snjay Raut Latest News In Marathi)

Sanjay Raut on
Maharashtra Politics LIVE: रजिस्टर इ-मेलवरून प्रस्ताव आला नाही, झिरवाळांच्या वकिलांचं स्पष्टीकरण

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात वडोदरा येथे एक गुप्त बैठक पार पडल्याची चर्चा आहे, याच बैठकीत संजय राऊत को टाईट करो असे ठरवण्यात आल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्राचाळी संदर्भात आजच ईडीकडून संजय राऊत यांनी ईडीने समन्स बजावले असून, उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश यामध्ये राऊत यांना बजावण्यात आले आहे.

Sanjay Raut on
महाराष्ट्रात भाजप सरकार स्थापन करणार? ‘हे’ आहेत मोठे संकेत

राऊत म्हणाले की, महाराष्ट्रासाठी आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अशा प्रकारच्या बनावट कारवाईने माझी मान कापली तरीही मी गुवाहाटीला जाणार नाही. तसेच कुणासमोरही गुडघे टेकाणार नाही. त्या ऐवजी मी तुरुंगात जाणे पसंत करेल. विरोधकांना माझ्या विरोधात आणखी काही खोटं खटले दाखल करायचे असतील तर ते खुशाल करू शकतात असे म्हणत त्यांनी थेट भाजपला आव्हान दिले आहे.

मी शिवसेनेचा वाघ असून, बाळासाहेब ठाकरेंसोबत 30 वर्षे काम केलं असून, शिवसेनेचा नेता आहे. एवढेच नव्हे तर, लढावू अशा सामनाचा संपादक आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या नोटीसा पाठवून माझं मनोबल कुणीही कमकुवत करू शकणार नाही असे म्हणत जिथं असेल तिथं मी शिवसेवनेसाठी लढत राहील असे राऊत यांनी यावेळी सांगितलं.

Sanjay Raut on
"हिसाब तो देना पडेगा " राऊतांना समन्स मिळताच सोमय्यांचं ट्वीट

दरम्यान, ईडेने आपल्याला नोटीस पाठवत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. परंतु, उद्या अलिबाग येथे सभा असल्याने आपल्याला चौकशीसाठी उद्या ईडी कार्यालयात हजर राहता येणार नाहीये. ही कायदेशीर लढाई असून, दिल्लीतील आणि महाराष्ट्रातील नेत्याचं जर अटक करण्याचे आदेश असतील तर ते मला केव्हाही अटक करून घेऊन जाऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com