

How Rich Is BJP New Data Reveals Party Financial Power
Esakal
Nitin Navin: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नवीन यांची निवड झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. पक्षाचे संघटनात्मक निर्णय घेण्यासह पक्षाच्या निधीचा वापर कुठे, कसा करायचा याचेही अधिकार नितीन नवीन यांच्याकडे असणार आहेत. भाजपने निवडणूक आयोगाला त्यांच्या संपत्तीची माहिती दिलीय. पक्षाकडून देण्यात आलेल्या अहवालात सांगितलं आहे की, भाजपला ६ हजार कोटींपेक्षा जास्त पैसे देणगीतून मिळाले आहेत.