दहशतवादाला थारा देणारा पाकिस्तान त्याचा बळी कसा? भारताचा राष्ट्रसंघात सवाल

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 22 August 2020

दहशतवादाला बळी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रसंघाच्या वतीने व्हर्च्युअल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

न्यूयॉर्क- दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांविरुद्ध राष्ट्रसंघाने कायमस्वरुपी कारवाई करावी, अशी अपेक्षा आज राष्ट्रसंघातील भारताचे कायम प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी व्यक्त केली. दहशतवाद्यांना थारा देणाऱ्या देशांना आपण दहशतवादाचे बळी आहोत, हे सांगण्याचा अधिकार नाही, असे तिरुमूर्ती यांनी ठणकावले.

दहशतवादाला बळी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रसंघाच्या वतीने व्हर्च्युअल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त तिरुमूर्ती यांनी ट्विट करत म्हटले, की या दिवसानिमित्त आपण दहशतवादी कारवायात किंवा हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची आठवण काढतो. तसेच सीमेपलीकडून दहशतवाद्यांना मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळत असल्याबद्धलही चिंता व्यक्त करतो. पण ठोस कारवाई केली जात नाही. यावेळी त्यांनी सीमेपलिकडून विशेषत: पाकिस्तानकडून दहशतवादी संघटनांना कसे पोसले जाते, याचा पुरावा सांगणारा तीन मिनिटाचा व्हीडिओ शेअर केला. त्यात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांनी घडवून आणलेल्या हल्ल्याचा उल्लेख आहे. 

मुंबईत हायअलर्ट! दिल्लीत IS दहशतवाद्याला पकडल्यानंतर पोलिस यंत्रणेला सूचना

१९९३ चा मुंबई बॉम्बस्फोट, २००१ संसंदेवरील हल्ला, २००२ चा अक्षरधाम मंदिरावरील हल्ला, २००८चा मुंबईवरील हल्ला, २०१६ चा उरी हल्ला आणि २०१९चा पुलवामा हल्ला याचा समावेश आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे म्हटले आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या फुटेजने हा व्हीडिओ सुरू होतो. या फुटेजमध्ये पाकिस्तानातून मुंबईवरील हल्ल्याचे नियंत्रण कसे केले गेले, याचे पुरावे दिले आहेत. लष्करे तय्यबाचे दहशतवादी हे पाकिस्तानातून मुंबईतील काही प्रमुख ठिकाणांवर हल्ला करण्याची सूचना देत आहेत, असे फुटेजमध्ये दिसते.

राष्ट्रसंघाच्या कार्यक्रमात दहशतवाद्याला बळी पडलेल्या नागरिकांचे कुटुंबीय तसेच जखमी झालेल्या नागरिकांचे एक पॅनल उपस्थित होते. पॅनेलमधील नागरिकांनी अनुभव सांगितले. दहशतवाद्यांमुळे त्यांचे जीवन कसे उद्धवस्त झाले, याची कहानी त्यांनी सांगितली. भारतातून या पॅनेलमध्ये निधी चापेकर यांनी सहभाग घेतला. त्या मार्च २०१६ च्या ब्रुसेल्स विमानतळ आणि सबवेवरील दहशतवादी हल्ल्यातून बचावल्या होत्या. निधी या जेट एअरवेजमध्ये काम करत होत्या. या चर्चेत त्यांचा एक फोटो देखील शेअर करण्यात आला. त्यात निधी चाफेकर या बुसेल्सच्या विमानतळावर जखमी अवस्थेत बसलेल्या दिसतात. त्यांच्या चेहरा धास्तावलेला दिसतो. त्या म्हणाल्या, की बेल्जियमधील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्यातून वाचलेल्या लोकांपैकी एक आहे. त्या या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या होत्या. आजही त्यांना मानसिक धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. त्या २३ दिवस कोमामध्ये होत्या.

कोरोना महामारी केव्हा संपेल? जागतिक आरोग्य संघटनेने दिली माहिती

राष्ट्रसंघ दहशतवाद पीडित नागरिकांच्या पाठिशी

राष्ट्रसंघाचे सरचिटणीस ॲन्टानिओ गुंतरेस म्हणाले, की दहशतवादी हल्ल्यात जगभरात असंख्य निष्पाप नागरिक मारले गेले आणि अशा नागरिकांच्या कुटुंबीयासमवेत राष्ट्रसंघ आहे. दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले आणि ज्यांच्या आयुष्यावर परिणाम झाला आणि त्यांचे जीवन बदलून गेले, अशा लोकांसमवेत राष्ट्रसंघ कायम राहिल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How is Pakistan a victim of terrorism India's question at the UN