esakal | 18 वर्षांवरील सर्वांना लस; नोंदणी कशी कराल?
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 18 वर्षापुढील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. त्यामुळे 1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनावरील लस मिळण्यास सुरुवात होईल.

18 वर्षांवरील सर्वांना लस; नोंदणी कशी कराल?

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 18 वर्षापुढील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. त्यामुळे 1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनावरील लस मिळण्यास सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी डॉक्टर्ससोबत बैठक घेतली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी हॉस्पिटल्समध्ये कोरोना लस मोफत असेल, तर खासगी हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला यासाठी काही किंमत मोजावी लागेल. लस घेण्यासाठी CoWIN ऍपवर रेजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.

रेजिस्ट्रेशन कसे कराल

- सर्वात प्रथम cowin.gov.in या वेबसाईटला भेट द्या

- येथे आधार कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर भरा

- तुम्हाला ओटीपी मोबाईलवर मिळेल, नंबर टाकून रेजिस्ट्रेशन करा

-रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही लसीकरणासाठी दिवस आणि वेळ ठरवू शकता

- हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही लस घेऊ शकता.

-यावेळी तुम्हाली रेफ्रन्स आयडी मिळेल, याच्या माध्यमातून तुम्हाला लस सर्टिफिकेट मिळू शकते.

हेही वाचा: कोरोना वॉरियर्ससाठी नवा विमा कवच; जुनी योजना रद्द

रेजिस्ट्रेशनच्यावेळी तुमच्याकडे खालीलपैकी एक डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे

- आधारकार्ड

-पॅनकार्ड

-मतदानकार्ड

-ड्रायव्हिंग लायसेन्स

-हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड

-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीम रोजगार कार्ड

-पासपोर्ट

-बँक/पोस्ट ऑफिसकडून जारी करण्यात आलेले पासबुक

-पेन्शन डॉक्युमेंट

- सर्विस आयडेन्टी कार्ड (केंद्रीय/राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेले)

कोरोना वितरणावरील निर्बंधही सरकारकडून शिथिल करण्यात आले आहेत. लस निर्मिती कंपन्या 50 टक्के पुरवठा केंद्र सरकारला करतील आणि उर्वरित 50 टक्के राज्य सरकार आणि ऑपन मार्केटमध्ये करु शकणार आहेत. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे हे महत्त्वाचे पाऊल असल्याचं म्हटलं जातंय.

loading image
go to top