गोव्यात बारावीचा निकाल ८५.५३ टक्के

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

क्रीडा गुणांचा फायदा
बारावीच्या परीक्षेत क्रीडा गुण मिळाल्याने २५५ जण उत्तीर्ण झाले. या गुणांमुळे उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण मात्र एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत केवळ १.४ टक्के आहे.  या परीक्षेत ३ हजार ७४३ जणांनी क्रीडा गुण मिळवले आहेत.

पणजी : गोवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ८५.५३ टक्के लागला. १७  हजार ७३९ विद्यार्थी सर्व विषय घेऊन तर ७६० विद्यार्थी काही विषय घेऊन परीक्षेस बसले होते. त्यापैकी सर्व विषयांसह परीक्षेस बसलेल्यांपैकी १५ हजार १७२ तर काही विषय घेऊन बसलेल्यांपैकी ३२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

ही परीक्षा ५ ते २६ मार्चदरम्यान राज्यातील १६ केंद्रांवर घेण्यात आली होती. कला शाखेचा निकाल ८५.१७ टक्के् लागला. या शाखेत सर्व विषयांसह ४ हजार ७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी ३ हजार ७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. काही विषय घेऊन २४२ विद्यार्थी बसले होते त्यापैकी ७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचा निकाल ९०.५८ टक्के लागला. सर्व विषयांसह ५ हजार ४०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी ४ हजार ८९३ जण उत्तीर्ण झाले. काही विषय घेऊन १९३ जणांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ६२ जण उत्तीर्ण झाले.

विज्ञान शाखेचा निकाल ८२.३१ टक्के लागला. सर्व विषय घेऊन ५ हजार ४६२ जणांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ४ हजार ४९६ जण उत्तीर्ण झाले. काही विषय घेऊन २६६ जणांनी परीक्षा दिली होती त्यापैकी १६३ जण उत्तीर्ण झाले. व्यावसायिक शाखेचा निकाल ८२.५८ टक्के लागला. सर्व विषयांसह २ हजार ७९६ जणांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी २ हजार ३०९ जण उत्तीर्ण झाले. काही विषय़ घेऊन ५९ जणांनी परीक्षा दिली होती त्यापैकी २३ जण उत्तीर्ण झाले.

मुलींचे प्रमाण अधिक
बारावीच्या परीक्षा ९ हजार ३९४ मुलींनी दिली होती त्यापैकी ८ हजार २९६ जणी (८८.३१ टक्के) उत्तीर्ण झाल्या. ८ हजार ३४५ मुलगे परीक्षेस बसले होते त्यापैकी ६ हजार ८७६ (८२.३९ टक्के) उत्तीर्ण झाले.

पर्वरीची आघाडी
बारावीच्या परीक्षेत परीक्षेत पर्वरी केंद्राचा निकाल सर्वाधिक ९६.८३ टक्के लागला. सर्वात कमी निकाल फोंडा केंद्राचा ७५ टक्के लागला.

९५ टक्क्यांवर निकाल देणारी विद्यालये
१. कार्मेल उच्च माध्मयिक विद्यालय, नुवे
२. श्री दामोदर उच्च माध्यमिक विद्यालय, मडगाव
३. फादर आग्नेल बहुउद्देशीय उच्च माध्मयिक विद्यालय, वेर्णा
४. मारीया बांबिना उच्च माध्यमिक विद्यालय, कुंकळ्ळी
५. सेंट अॅण्ड्यू उच्च माध्मयिक विद्यालय, वास्को
६. सेंट तेरेझा ऑफ जीजस उच्च माध्यमिक विद्यालय, काणकोण
७. विश्वनाथ महादेव परुऴेकर उच्च माध्मयिक विद्यालय, वेरे
८. विद्या प्रबोधिनी उच्च माध्यमिक विद्यालय, पर्वरी
९. कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्था उच्च माध्यमिक विद्यालय, कोरगाव
१०. वसंत कुकाळेकर उच्च माध्यमिक विद्यालय, जुनेगोवे
११. मुष्ठीफंड उच्च माध्यमिक विद्यालय, पणजी
१२. मुष्ठीफंड आर्यन उच्च माध्यमिक विद्यालय, पणजी
१३. के. ब. हेडगेवार उच्च माध्यमिक विद्यालय, पणजी

क्रीडा गुणांचा फायदा
बारावीच्या परीक्षेत क्रीडा गुण मिळाल्याने २५५ जण उत्तीर्ण झाले. या गुणांमुळे उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण मात्र एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत केवळ १.४ टक्के आहे.  या परीक्षेत ३ हजार ७४३ जणांनी क्रीडा गुण मिळवले आहेत.

Web Title: hsc results declared in Goa

टॅग्स