Latest Marathi Live Update News : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. आज (ता. २९) पूर्व विदर्भात पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. मराठवाड्यातील हिंगोली, लातूर, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसरपासून, डेहराडून, खेरी, कमी क्षेत्राचे केंद्र, मधुपूर, बंकुरा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला होता.