
अमृतसरच्या गुरू नानकदेव रुग्णालयात भीषण आग; रुग्णांना काढले बाहेर
पंजाबमधील अमृतसर येथील गुरू नानकदेव रुग्णालयात (Hospital) भीषण आग (fire) लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णांना बाहेर काढण्यात आले. रुग्णालयाच्या विविध वॉर्डांमधून मोठ्या संख्येने रुग्ण धावून रस्त्यावर येत होते. धुरामुळे रुग्णांना श्वास घेणे कठीण झाले होते. ही घटना शनिवारी (ता. १४) दुपारी घडली. (Huge fire broke out at Guru Nanak Dev Hospital in Amritsar)
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाला आग लागल्यानंतर काही वेळातच आगीने (fire) भीषण रूप धारण केले. आग इतक्या वेगाने लागली की रुग्णांना बाहेर पडण्याची संधी मिळत नव्हती. यामुळे रुग्णांमध्ये ओरड सुरू झाली. आगीच्या धुरामुळे रुग्णांना श्वास घेणे कठीण झाले होते. परंतु, कोणीही त्यांना मदत केली नाही. रुग्णांनी स्वतःहून बाहेर येऊन प्राण वाचवले.
माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू आहे. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे अग्निशमन अधिकारी लवप्रीत सिंग यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पंजाबचे मंत्री हरभजन सिंग यांनी सांगितले.
इमारत पूर्णपणे जळून खाक
हॉस्पिटलच्या (Hospital) पाठीमागील ट्रान्सफॉर्मरला अचानक आग (fire) लागली. प्रथम एका ट्रान्सफॉर्मरला आग लागली. त्यानंतर दुसऱ्याला आग लागल्याने धूर रुग्णालयात पसरला. त्यामुळे रुग्णांमध्ये भीती पसरली आणि नातेवाइकांसह रस्त्याकडे धाव घेतली. आगीत इमारत पूर्णपणे जळून खाक झाली.
Web Title: Huge Fire Broke Out At Guru Nanak Dev Hospital In Amritsar Patients Were Taken Out
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..