'भारताकडील क्षेपणास्त्रे सजवून ठेवण्यासाठी आहेत का?'

Rekha
Rekha

जयपूर : हुतात्मा जवानाच्या घरी भेटण्यासाठी येणारे लोक अशी विचारपूस करतात, जशी काय लग्नाची बोलणी करायला आले आहेत. उद्या हेच लोक सगळं काही विसरून जातील. माझा भाऊ जेव्हा सुटी संपवून निघायचा त्यावेळी म्हणायचा जिवंत राहिलो तर परत येईन, शेवटच्यावेळीही तो तेच म्हणाला होता. भारताकडे असलेली क्षेपणास्त्रे सजवून ठेवण्यासाठी आहेत का, असा प्रश्न हुतात्मा जवानाच्या बहिणीने केला आहे.

पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. यामध्ये राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील बिनोल गावात राहणारा नारायणलाल गुर्जर हा जवान हुतात्मा झाला होता. या गावात अवघी 400 घरे असून, जवान हुतात्मा झाल्यानंतर गावावर शोककळा पसरली आहे. जवानाच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असून, याबाबत त्यांच्या बहिणीने व्यथा मांडली आहे. सहा महिन्यांची असताना वडिल गेले, तीन वर्षांची असताना आई गेली आणि आता सांभाळ करणारा भाऊही गेला, असे नारायणलाल यांची बहिण रेखा यांनी म्हटले आहे.

रेखा म्हणाली, ''माझी वहिनी या घटनेनंतर सतत बेशुद्ध होत आहे. पण, शुद्धीत आल्यानंतरही त्या माझा मुलगा लष्करात जाईल. माझा भाऊ पण म्हणायचा मुलगा लष्करात जाणार. सातवीत असणारा माझा भाचा दररोज पळायला जातो, कारण लष्करात नाही गेला म्हणून त्याचे वडिल नाराज नको व्हायला. माझ्या वहिनीचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.''

माझा भाऊ जानेवारीमध्ये 15 दिवसांच्या सुटीवर आला होता. सकाळी तो गावातील मुलांना घेऊन पळायला जात असे. त्यानंतर तो मुलांनी लष्करात घेत असलेल्या क्लासप्रमाणे क्लास घेत असे. लष्कराच्या जागा निघाल्यानंतर तो फोन करून गावातील तरुणांना याबाबतची माहिती देत होता. देशसेवापेक्षा मोठे काही नाही, असे तो सतत सांगत असे. गुरुवारी त्याने जम्मूहून फोन केला होता, की सीआरपीएफची गाडी आली तर आम्ही निघणार आहोत, नाहीतर येथेच थांबू. पण, गाडी आली आणि माझा भाऊ निघाला. त्यानंतर हल्ल्याबाबतची माहिती मिळाली. आम्हाला सतत वाटायचे की माझा भाऊ त्या गाडीत नसावा, पण..., असे रेखा यांनी म्हटले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com