विनोदी लेखक तारक मेहता यांचे निधन

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

सब टीव्ही प्रसारित होणारी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही लोकप्रिय मालिका मेहता यांच्या लेखनावर आधारित आहे. 'चित्रलेखा' या गुजराती साप्ताहिकासाठी मार्च 1971 पासून 'दुनिया ना उंधा चश्मा' नावाचं स्तंभलेखन केलं होतं. त्यावरून ही मालिका करण्यात आली.

अहमदाबाद : भाषेचा दर्जा कधीही घसरू न देता नर्मविनोदी भाषेत समाजातील प्रवृत्तींवर बोट ठेवून रसिकांना हसविणारे  प्रसिद्ध विनोदी लेखक तारक मेहता यांचे आज (बुधवार) निधन झाले.  ते 87 वर्षांचे होते. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांनी अहमदाबाद येथे अखेरचा श्वास घेतला. 

त्यांच्या लेखनावर आधारित 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही कौटुंबिक विनोदी मालिका लोकप्रिय ठरली. दर्जेदार व सभ्य अशा भाषावैशिष्ट्यामुळे तारक मेहता यांच्या विनोदी लेखनाचा आनंद कुटुंबासह घेता येतो. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत त्यांचे लेखन पोचले.  

तारक मेहता यांना 'पद्मश्री' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 'चित्रलेखा' या गुजराती साप्ताहिकासाठी मार्च 1971 पासून 'दुनिया ना उंधा चश्मा' नावाचं स्तंभलेखन केलं होतं. सब टीव्ही प्रसारित होणारी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका या लेखनावर आधारित आहे.

येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात त्यांचे देहदान करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे. तारक मेहता यांनी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 
 

Web Title: humorist tarak mehta passes away in ahmedabad