वर्षभरात शंभराहून अधिक वाघांचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 5 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : मावळत्या वर्षात देशभरात 106 वाघांचा विविध कारणांनी मृत्यू झाल्याची माहिती आज केंद्र सरकारने दिली. वाघांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत; परंतु वाघांच्या मृत्यूचे कारण विविध ठिकाणी सुरू असलेली बेकायदा शिकार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्री अनिल माधव दवे यांनी सभागृहात विचारलेल्या लेखी प्रश्‍नावर उत्तर देताना राज्यसभेत सांगितले, की मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी 2016 पासून ते आतापर्यंत 106 वाघांचा मृत्यू झाला आहे. 2015 च्या जानेवारीपासून ते आतापर्यंत 42 वाघांची शिकाऱ्यांकडून हत्या झाल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी शिकाऱ्यांमुळे 12 वाघांचा मृत्यू झाला.

त्याचबरोबर या वर्षी 30 नोव्हेंबरपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार शिकाऱ्यांमुळे 30 वाघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार वर्षांत वाघांची संख्या सरासरी तीस टक्के वाढली असल्याची माहिती दवे यांनी दिली.

Web Title: hundred tigers die over the last year