दिल्लीकर चालविणार शेकडो योगवर्ग!

राजधानी दिल्लीतील शेकडो विनामूल्य योगवर्गांना परवानगी देण्याचे केंद्र सरकारने सूडबुध्दीने नाकारले तरी दिल्लीकर हे वर्ग बंद पडू देणार नाहीत असा विश्वास दिल्ली सरारने व्यक्त केला आहे.
Yoga-Class
Yoga-Classsakal
Summary

राजधानी दिल्लीतील शेकडो विनामूल्य योगवर्गांना परवानगी देण्याचे केंद्र सरकारने सूडबुध्दीने नाकारले तरी दिल्लीकर हे वर्ग बंद पडू देणार नाहीत असा विश्वास दिल्ली सरारने व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील शेकडो विनामूल्य योगवर्गांना परवानगी देण्याचे केंद्र सरकारने सूडबुध्दीने नाकारले तरी दिल्लीकर हे वर्ग बंद पडू देणार नाहीत असा विश्वास दिल्ली सरारने व्यक्त केला आहे. योगशिक्षण देणाऱा सुमारे पावणेसहाशे प्रशिक्षकांच्या वेतनासाठी त्यांनी ७२७७९७२७७९ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठविण्याचे दानशूर दिल्लीकरांना आवाहन केले आहे.

नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी दिल्लीतील विनामूल्य योगशिक्षण वर्गांच्या फाईलवर सही करण्याचे नाकारले. त्यामुळे या महिन्यात सुरवातीचे दोन दिवस हे वर्ग झाले नाहीत. मात्र नियमित योगशिक्षण घेणाऱया हजारो दिल्लीकरांनी केंद्राच्या या सूडबुध्दीच्या कारवाईवर रोष व्यक्त करत योगवर्ग चालू ठेवण्याचे आवाहन दिल्ली सराकरला केले. केजरीवाल यांनी त्यानंतर जनसहभागातून योगशिक्षण देणार अशी घोषणा केली. प्रसंगी भीक मागू पण योगशिक्षकांचे वेतन रखडणार नाही असा विश्वास त्यांनी दिला. केंद्राने याबातच्या आर्थिक तरतुदीला मंजुरी नाकारल्यावर दिल्ली सराकरने दानशूरांच्या मदतीने योगप्रशिक्षण जारी ठेवण्याचमार्ग शोधला आहे. केंद्राकडून त्यासाठीही जाणूनबुजून आडकाठी येत नाही तोवर योगशिक्षकांचे वेतन व दिल्लीतील हजारो योगसाधकांचे प्रशिक्षण चालू राहील असे सरकारच्या वीतने स्पष्ट करण्यात आले.

योगाचे वर्ग बंद होऊ देणार नाहीत, असा निर्धार सर्वांनी केला असे सांगून केजरीवाल यांनी टीका केली की नायब राज्यपालांनी देवदत्तप्रमणे दिल्लीच्या जनतेवर बाण सोडले. पण आम्ही (दिल्ली सरकारने) सिद्धार्थासारखे चिकाटीने योगाचे वर्ग चालू ठेवले. केजरीवाल यांनी सांगितले की २ दिवस वर्ग बंद होता. उर्वरित काळात योगवर्ग रोज सकाळी आणि संध्याकाळी सुरू आहेत. हे पुण्याचे काम आहे. त्यासाठी दिल्लीतील अनेकांना योगदान द्यायचे आहे असे संदेश सरकारकडे आले आहेत.दिल्ली सरकारच्या वतीने योग शिक्षकांना दर महिन्याला प्रत्येकी १५ हजार रुपये देण्यात येतात. ज्यांना एक ते-तीन शिक्षकांचा पगार देण्याची इच्छा आहे, त्यांनी व्हॉट्सअॅपवर ७२७७९७२७७९ या क्रमांकावर मेसेज करावा. आम्ही या महिनाअखेरीस शिक्षकांची नावे जाहीर करू. या पुण्यकार्यात दिल्लीतील जनता आपापल्या परीने सहकार्य करेल असाही विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com