मोदींनी येथील प्रकल्प पळवल्याचे दुःख : राहुल गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

माझ्यावर कितीही टीका झाली, तरी मला त्याने फरक पडणार नाही. मात्र मोदींनी अमेठी व रायबरेलीच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला फूड प्रकल्प पळविल्याचे आपणास दुःख आहे.

- राहुल गांधी

रायबरेली : विरोधकांकडून आपल्यावर टीका होते याचे आपल्याला फारसे देणे-घेणे नाही. मात्र केंद्र सरकारकडून रायबरेली व अमेठी या मतदारसंघ क्षेत्रांतून सुरू असलेली प्रकल्पांची पळवापळवी दुःखद असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

पथरौली गावात झालेल्या एका सभेत ते बोलत होते. राहुल म्हणाले, "उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 250 जागा जिंकणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना 2019 मध्ये गुजरातमध्ये परत पाठवणे, असे ध्येय कॉंग्रेस-समाजवादी पक्ष आघाडीने समोर ठेवले आहे. माझ्यावर कितीही टीका झाली, तरी मला त्याने फरक पडणार नाही. मात्र मोदींनी अमेठी व रायबरेलीच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला फूड प्रकल्प पळविल्याचे आपणास दुःख आहे.''

मोदींनी 50 कुटुंबीयांना, तसेच विजय मल्ल्यास मोठी रक्कम सोपविली असून, त्यांनी रोजगाराच्या किती संधी उपलब्ध केल्या. हीच रक्कम जर प्रकल्पांना दिली असती, तर त्यातून लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असता, असेही राहुल यांनी स्पष्ट केले. अमेठी, रायबरेलीत पेपर मिल, रेल्वे डबेनिर्मिती प्रकल्प सुरू करण्याची कॉंग्रेसची योजना असून, त्यामुळे हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी माहितीही राहुल यांनी दिली.

Web Title: hurt by modi snatched projects from raebareli : rahul gandhi