मला नवरा नको, प्रियकरच हवाय...

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

मी, प्रियकरासोबत जात असताना नवऱयाने आम्हाला आडवल. पण, मला नवरा नकोय, त्याच्यावर कारवाई करा. नवऱयापेक्षा माझा प्रियकर कितीतरी चांगला आहे, असे पत्नीने पोलिसांना सांगितले.

मेरठ : मी, प्रियकरासोबत जात असताना नवऱयाने आम्हाला आडवल. पण, मला नवरा नकोय, त्याच्यावर कारवाई करा. नवऱयापेक्षा माझा प्रियकर कितीतरी चांगला आहे, असे पत्नीने पोलिसांना सांगितले.

एकाची पत्नी प्रियकरसोबत दुचाकीवरून जात होती. दोघे दुचाकीवरून फिरत असताना पतीने दोघांना पाहिले. दोघांना त्याने भर रस्त्यात आडवले. भर रस्त्यात तिघांचे बांडण सुरू झाले. अखेर, पत्नीने पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलवले. पोलिस आल्यानंतर तिघांना चौकीत घेऊन गेले.

पोलिसांना माहिती देताना पती म्हणाला, 'माझा विवाह आठ वर्षापूर्वी झाला आहे. पण, पत्नी माझ्याशी चांगली वागत नाही. पत्नी अनेकदा प्रियकरासोबत फिरायला जाते. नातेवाईकांसह अनेकांनी तिला समजावून सांगितले पण ती ऐकतच नाही.'

पत्नी म्हणाली, 'माझ्या पतीने मला व माझ्या प्रियकराला भर रस्त्यात अडवून मारहाण केली. आम्हा दोघांची खून करण्याचा त्याचा प्रयत्न होता. मला पती नको आहे, प्रियकरच हवा आहे. हवा तर लगेच घटस्फोट द्या. काही झाले तरी प्रियकराला सोडणार नाही.'

पोलिस अधिकारी डॉ. ए. एन. सिंह म्हणाले, 'पती विरोधात मारहाण व खूनाचा प्रयत्न अशी तक्रार महिलेने दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास करत आहोत.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband caught wife with boyfriend at meerut