
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका पतीने आपल्या पत्नीसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. अवैध संबंधांच्या संशयावरून पतीने पत्नीला मारहाण केली आणि तिचे केस कापले. ज्यामुळे ती वेगळी दिसू लागली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पतीचा शोध सुरू केला आहे. महिलेने सांगितले की, तिचा पती तिच्या चारित्र्यावर संशय घेतो. म्हणून त्याने माझे केस कापले.