

Cyclone Montha
ESakal
केरळमध्ये मोंथा चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. मुसळधार पावसामुळे इडुक्की जिल्ह्यातील आदिमाली येथे भूस्खलन होऊन एक घर कोसळले. ढिगाऱ्याखाली गाडल्यामुळे एका पुरूषाचा मृत्यू झाला. त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. आपत्कालीन पथके आणि स्थानिक रहिवाशांनी सात तास बचाव कार्य केले आणि जखमी महिलेला वाचवले.