
उत्तर प्रदेशातील जौनपूरमधून तिहेरी तलाकचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पत्नीने पतीकडून नवीन कपड्यांचा जोड मागितला होता. यामुळे पती इतका नाराज झाला की त्याने फोनवरच पत्नीला घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर पत्नीने पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.