'या' गावात बायको प्रेग्नंट होताच नवरा करतो दुसरं लग्न, कारण ऐकूण थक्क व्हाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wedding

'या' गावात बायको प्रेग्नंट होताच नवरा करतो दुसरं लग्न, कारण ऐकूण थक्क व्हाल

भारतात वेगवेगळ्या भागात अनेक प्रथा आहेत.कधी कधी काही प्रथा या अविश्वसनीय वाटतात. सध्या राजस्थानच्या एका गावची प्रथा चांगलीच व्हायरल होतेय. या प्रथेनुसार बायको गरोदर झाली की नवरा दुसरं लग्न करतो.हो, हे खरंय.

भारतात पहिल्या बायकोला घटस्फोट न देता दुसऱ्या लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे.अशात बायको गरोदर असताना नवरा खुशाल दुसरं लग्न करतोय. विशेष म्हणजे या लग्नाला गरोदर बायकोही समर्थन देते. सध्या सर्वत्र या प्रकरणाची चर्चा होतेय.

हेही वाचा: पंतप्रधान मोदींच्या लेखातला बालपणीचा मित्र 'अब्बास' कोण? जाणून घ्या...

ही अजब प्रथा राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील देरासर गावातील आहे.कित्येक वर्षापासून ही प्रथा पाळली जाते. विशेष म्हणजे या प्रथेमागील कारण ऐकाल तर थक्क व्हाल. बायको प्रेग्नंट असताना नवरा दुसरे लग्न पाण्यासाठी करतो. हो, या गावात पाण्याची समस्या आहे आणि गावातील महिला कित्येक मैल पायपीट करून पाणी आणतात.मग त्यासाठी स्वत: महिला गरोदर असताना नवऱ्याचे दुसरे लग्न लावून देतात.

हेही वाचा: नाकावाटे दिली जाणारी कोविड-19 लस अंतिम टप्प्यात

बायको गरोदर झाल्यावर घरकामाचा विशेष म्हणजे कित्येक मैल पायपीट करुन पाणी आणण्याचा प्रश्न निर्माण होतो.आणि या गावातील पुरुष घरकाम करत नाहीत.त्यामुळे दुसरं लग्न पर्याय उत्तम असतो.यामुळे गरोदर पत्नीला आराम मिळते त्यामुळे तिला या लग्नाचा काहीच त्रास होत नाही. सध्या या गावाची प्रथा चर्चेचा विषय ठरली आहे.

Web Title: Husband Marries To Someone Else When Wife Becomes Pregnant

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top