पतीला पॉर्नसाइटचे व्यसन; पत्नी न्यायालयात

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली- पतीला पॉर्नसाइटचे व्यसन लागले असून, त्याचा आमच्या कुटुंबावर परिणाम होत आहे. सरकारने पॉर्नसाइट तत्काळ बंद कराव्यात, अशी मागणी करणारी याचिका महिलेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. संबंधित बातमी एका संकेतस्थळाने प्रसिद्ध केली आहे.

न्यायालयात याचिका दाखल करणारी महिला सामाजिक कार्यकर्ती असून, पंच्चावन्न वर्षीय पती उच्च शिक्षित आहे. मुंबईत राहणाऱया जोडप्याच्या विवाहाला 30 वर्षे झाली आहेत. सन 2015 पासून पतीला पॉर्नसाइटचे व्यसन लागले आहे. पतीच्या या सवयीमुळे आपले वैवाहिक आयुष्य अडचणीत आले आहे. याचा आमच्या कुटुंबियांना त्रास होत आहे. यामुळे सरकारने पॉर्नसाइटवर बंदी घालावी, असे याचिकेत म्हटले आहे.

माझा पती रोजचा बहुतांश वेळ पॉर्नसाइटवरील व्हिडिओ व छायाचित्रे पाहण्यात घालवतो. अश्लील व्हिडिओ पाहणे हा गुन्हा नसला, तरी त्यामुळे महिलांविरोधी गुन्ह्यात वाढ होत आहे, असेही महिलेने म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने चाईल्ड पॉर्नोग्राफीवर बंदी आणण्यासाठी सरकारला सुचवले होते. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देश काहीही खपवून घेऊ शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले होते.

Web Title: husband pornography addiction; women files petition