पत्नीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास पती असमर्थ, हायकोर्टानं घटस्फोटाला दिली परवानगी; 17 दिवसच टिकू शकलं लग्न

High Court approves divorce: मुंबई हायकोर्टाने एका नवविवाहीत जोडप्याला घटस्फोट घेण्याची परवानगी दिली आहे. कोर्टाने यावेळी रिलेटिव्ह इंपोटेन्सीचा हवाला दिला.
High Court
High Court

नवी दिल्ली- मुंबई हायकोर्टाने एका नवविवाहीत जोडप्याला घटस्फोट घेण्याची परवानगी दिली आहे. कोर्टाने यावेळी रिलेटिव्ह इंपोटेन्सीचा हवाला दिला. पीडितेने कोर्टात याचिका दाखल करत म्हटलं होतं की, २७ वर्षीय पती लैंगिक संबंध ठेवू शकत नाहीये. त्यामुळे हे लग्न रद्द करण्याची परवानगी देण्यात यावी. कोर्टाने पीडित महिलेची मागणी मान्य केली आहे.

हायकोर्टाने पतीच्या रिलेटिव्ह इंपोटेन्सीमुळे लग्न पुढे सुरु ठेवले जाऊ शकत नाही, असं म्हटलं आहे. मानसिक, भावनात्मक आणि शारीरिकरित्या पती पत्नीसोबत जुडू शकला नाही, त्यामुळे दोघांनी वेगळं होणं योग्य राहील असं कोर्टाने म्हटलं. विशेष म्हणजे जोडप्याचे लग्न १७ दिवसच टिकू शकले. (Husband unable intercourse with wife High Court approves divorce The marriage lasted only 17 days)

High Court
Supreme Court: तुम्ही पॉर्न का डाउनलोड केले? प्रतिवादींचे उत्तर एकूण CJI चंद्रचूड आश्चर्यचकित, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

न्यायमूर्ती विभा कांकणवाडी आणि न्यायमूर्ती एस जी चपलगांवकर यांच्या खंडपीठाने याप्रकरणी सुनावणी घेतली होती. १७ दिवसांमध्येच पती-पत्नीमधील निराशा, असमाधान समोर आले, असं कोर्टाने म्हटलं. मिळालेल्या माहितीनुसार, जोडपे याआधी फॅमिली कोर्टामध्ये गेले होते. पण, त्यांची याचिका फेटाळून लावण्यात आली होती.त्यानंतर जोडप्याकडून हायकोर्टामध्ये धाव घेण्यात आली होती.

घटस्फोटाचे कारण ठरले

लग्नानंतर पती लैंगिक संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याचं पत्नीच्या लक्षात आलं. त्यानंतर पत्नीने फॅमिली कोर्टामध्ये याचिका दाखल करत घटस्फोटाची मागणी केली होती. फॅमिली कोर्टाने याचिका फेटाळली पण हायकोर्टाने याची दखल घेतली. कोर्ट म्हणालं की, पती-पत्नी भावनिक, मानसिक आणि शारीरिकरित्या एकमेकांशी जोडले जाणे आवश्यक आहे. तसेच रिलेटिव्ह इंपोटेन्सी ही एक अशी स्थिती आहे जी नंपुसकतेपेक्षा वेगळी आहे.

रिलेटिव्ह इंपोटेन्सीबाबत काही शारीरिक आणि मानसिक कारणे असू शकतात. पतीला आपल्या पत्नीशी रिलेटिव्ह इंपोटेन्सी असल्याचं याप्रकरणात दिसतं. पत्नीसोबत पती शारीरिक संबंध ठेवू शकत नाही. त्यामुळे घटस्फोटासाठी हे कारण ठरु शकतं. पतीने सुरुवातीला आपल्या पत्नीलाच यासाठी जबाबदार धरलं होतं. आपली असमर्थता तो मान्य करण्यास कचरत होता, असं कोर्टाने म्हटलं.

१७ दिवसांचा संसार

मार्च २०२३ मध्ये जोडप्याचे लग्न झाले होते. जोडप्यामध्ये शारीरिक संबंध होऊ शकले नाहीत. पत्नीने दावा केला की पती तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देत आहे. पतीने म्हटलं की, त्याला पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवता आले नसले तरी तो नपुंसक नाही. १७ दिवसांनतरच जोडपे एकमेकांपासून वेगळे झाले होते. त्यानंतर हे प्रकरण दोन्ही बाजूंनी फॅमिली कोर्टात गेलं.

High Court
Supreme Court : ''प्रत्येकाला मतदानाची स्लिप मिळाली तर?'' सुप्रीम कोर्टाचा प्रश्न अन् निवडणूक आयोगाने सांगितला धोका

रिलेटिव्ह इंपोटेन्सी काय आहे?

रिलेटिव्ह इंपोटेन्सी म्हणजे अशी नपुंसकता ज्यात व्यक्ती एका विशिष्ट व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास असमर्थ ठरतो. याचा अर्थ तो दुसऱ्या व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवू शकत नाही असा होत नाही. तो मानसिक आणि भावनिकदृष्या जोडल्या न गेलेल्या व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवण्यास असमर्थ असतो. ही एक सर्वसामान्य नपुंसकतेपेक्षा वेगळी स्थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com