माझ्या पत्नीला दारू प्यायला सांगा हो...

husband wants his wife to learn drink takes her for counselling at bhopal
husband wants his wife to learn drink takes her for counselling at bhopal

भोपाळ: कुटुंबामध्ये दारू पित असल्याच्या कारणावरून भांडणे होतात. मात्र, एका कुटुंबामध्ये पत्नी दारू पित नाही म्हणून पतीने न्यायालयात धाव घेतली आहे. माझ्या पत्नीला दारू प्यायला सांगा हो, अशी पतीची तीव्र इच्छा आहे.

भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणाची चर्चा शहरभर पसरली आहे. पत्नीने दारू प्यायली पाहिजे, किमान कौटुंबिक कार्यक्रमात प्यायलीच पाहिजे, अशी पतीची इच्छा आहे.

समुपदेशक शैल अवस्थी म्हणाल्या, न्यायालयात दाखल झालेले हे प्रकरण खूपच वेगळे आहे. मी, आतापर्यंत कधीच असे प्रकरण पाहिलेले नाही. संबंधित कुटुंब मध्यमवर्गीय असून, त्यांची आर्थिक परिस्थिती साधारण आहे. पती खासगी कंपनीत नोकरी करतो. पतीच्या कुटुंबातील आई, वडील, भाऊ, बहिण असे सगळेच दारू पितात. शिवाय, इतर नातेवाईकही कौटुंबिक कार्यक्रमात दारू पितात. मात्र, पत्नी दारू पित नाही. विवाहानंतर पती-पत्नीमध्ये कोणताही वाद नव्हता. परंतु, काही दिवसानंतर हळूहळू वाद सुरू झाला. सासरच्या व्यक्तींनी महिलेला दारू पिण्यासाठी दबाव टाकू लागले. किमान आम्हाला कंपनी तरी दे, यासाठी सक्ती केली जाऊ लागली.'

महिला म्हणाली, 'मला दारू पाहायला सुद्धा आवडत नाही. माझ्या माहेरकडच्या कुटुंबामध्ये कोणीही दारू पित नाही. परंतु, सासरकडे संस्कृती नावाची कोणती गोष्टच नाही. कुटुंबातील सर्वच जण दारू पितात. मला कंपनी दे म्हणून दबाव टाकू लागले. यामुळे अनेकदा मी मुलांना घेऊन माहेरी जात असे.'

दरम्यान, या दाम्पत्याला तीन मुले आहेत. भांडणाचे दुसरे कोणतेही कारण नसून, दारू प्यायची हे एकच कारण आहे, यामुळे कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. सध्या हे दाम्पत्य समुपदेशकाची मदत घेत असून, महिलेला दारू पिण्याची बळजबरी करू नये म्हणून सांगितले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com