Murder : पत्नीच्या डोळ्यादेखत पतीची हत्या; आंतरजातीय विवाह केल्याचा राग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Husbands murder in the eyes of his wife

पत्नीच्या डोळ्यादेखत पतीची हत्या; आंतरजातीय विवाह केल्याचा राग

पत्नीसह बाईकवरून घरी जाणाऱ्या तरुणाची दोघांनी लोखंडी रॉडने वार करून हत्या (murder) केली. पत्नीच्या नातेवाइकांनी तरुणाची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. कारण, तरुणाने मुस्लिम मुलीशी विवाह केला होता. बी नागराजू असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना हैदराबादमध्ये घडली. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी हत्येचा निषेध केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. (Husbands murder in the eyes of his wife)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी नागराजू आणि फातिमा घरातून बाहेर जाण्यासाठी निघाले. सरूरनगरमध्ये ते थांबले. यावेळी हल्लेखोरांनी तरुण जोडप्यावर लोखंडी रॉडने वार केला. या हल्ल्यात नागराजू याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. परंतु, घटनास्थळावरील सीसीटीव्ही व मोबाईल फोनच्या व्हिडिओमध्ये ते पकडले गेले.

प्रत्यक्षदर्शींनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये नागराजू डोक्यावर वार केल्यानंतर रस्त्यावर पडलेला दिसतो. हल्लेखोरांसमोर फातिमा असहाय्य दिसत आहे. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित लोक हल्लेखोरांना मारण्यासाठी धावतात. मृत पत्नीसह दुचाकीवरून जात होता. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते. दोघेही वेगवेगळ्या समाजाचे आहेत. मृताच्या पत्नीच्या भावांनी नागराजूवर रॉडने वार (beating) करून हत्या (murder) केल्याचा संशय आहे. त्यांना पकडण्यासाठी विशेष पथके तयार केले आहेत, असे पोलिस अधिकारी श्रीधर रेड्डी म्हणाले.

कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध लग्न

नागराजू आणि फातिमा हे दोघे एकमेकांना दहावीपासून ओळखत होते. ते एकमेकांना ११ वर्षांहून अधिक काळापासून ओळखतात. जानेवारीमध्ये हैदराबादमधील आर्य समाज मंदिरात त्यांचा विवाह झाला होता. त्यांनी कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध लग्न (Interracial marriage) केले होते. लग्नानंतर फातिमाने नाव बदलून पल्लवी ठेवले. मात्र, फातिमाच्या कुटुंबीयांनी नागराजूला धमकी देऊन दूर राहण्यास सांगितले होते.

टॅग्स :murderCrime NewsHyderabad