esakal | समोर बायको आणि तीन गर्लफ्रेंडना पाहून नवऱ्याची बोलती बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Blog on break up day

समोर बायको आणि तीन गर्लफ्रेंडना पाहून नवऱ्याची बोलती बंद

sakal_logo
By
दीनानाथ परब

अहमदाबाद: विवाहित (married) असूनही अविवाहित (unmarried) असल्याचे भासवून तरुणींची फसवणूक (cheat to girls) करणाऱ्या एका व्यक्तीला पत्नीने चांगलीच अद्दल घडवली आहे. या पतीराजांनी आपली चोरी अशा प्रकारे पकडली जाईल, याची कल्पनाही केली नसेल. या व्यक्तीची बाहेर एकाचवेळी बाहेर तीन प्रेमप्रकरण सुरु होती. पतीचं सतत मोबाइलवर चॅटिंग (mobile chatting) सुरु असायचं. पत्नीच्या मनात तेव्हाच संशयाची पाल चुकचुकली होती. आपण ज्याच्यावर इतकं प्रेम करतोय, त्याचं लग्न झालय. तो एका मुलाचा पिता आहे, याची तिघींनाही कल्पना नव्हती. (husbund had three extra marratial affairs Wife catches man in Ahmedabad dmp 82)

नवऱ्याकडून घरगुती छळ सुरु झाल्यानंतर पीडित महिलेने अभयम हेल्पलाईनला फोन केला. नवऱ्याला इतका वेळ घराबाहेर का असतो? म्हणून पत्नी प्रश्न विचारायची, त्यावेळी तो तिला मारहाण करायचा. दोघांचा प्रेमविवाह आहे. १० वर्षांपूर्वी परस्परांच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांनी लग्न केले. या जोडप्याला आठ वर्षांचा मुलगा आहे.

हेही वाचा: 8 कोटींच्या कारचा मालक असलेल्या शिवसैनिकावर 35 हजाराच्या वीजचोरीचा आरोप

नवऱ्याचे वर्तन पाहून बायकोच्या मनात संशय निर्माण झाला. तिने त्याच्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली. तिला त्याच्या मोबाइलमध्ये काही संशयास्पद मेसेजेस दिसले. यावरुन त्याचे बाहेर प्रेम प्रकरण सुरु असल्याची खात्री पटली. तिने सासू-सासऱ्यांना या बद्दल सांगितले. पण त्यांनी विषय ताणू नको, असा सल्ला दिला.

हेही वाचा: "हे तर सुनेला पोळ्या जमत नसल्याने पीठ अंगावर ओतून घेण्यासारखं"

"शेवटी तिनेच सोक्ष-मोक्ष लावण्याचा निर्णय घेतला. तिला नवऱ्याच्या मोबाइलमध्ये जे फोन नंबर मिळाले होते. तिने त्यावरुन तिन्ही तरुणींशी संपर्क साधला. तिघींनी महिलेशी बोलताना तिच्या नवऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे मान्य केले व तो विवाहित असल्याचे त्याने लपवून ठेवल्याचं सांगितलं. तिने त्यानंतर तिघिंना एकत्र एका ठिकाणी बोलावलं. नवऱ्यालाही तिथे यायला सांगितलं. समोर बायकोला आणि तिन्ही गर्लफ्रेंडना पाहून त्याची बोलतीच बंद झाली. काय बोलावं हेच त्याला कळल नव्हतं, त्याची चोरी पकडली गेली होती" असं समुपदेशकांनी सांगितलं. अभयमच्या टीमने त्या माणसाचं समुपदेशन केलं व त्याला विवाहबाह्य संबंध संपवण्याचा सल्ला दिला.

loading image