

Police investigate a shocking Hyderabad murder case where a daughter, along with her boyfriend, allegedly killed her mother and hid the body inside their house for nearly a year.
esakal
हैदराबादमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणीने आपल्या प्रियकराच्या संगनमताने, स्वतःच्याच आईची हत्या केली आणि तिचा मृतदेह जवळपास वर्षभर घराच्या आतच लपवून ठेवला.ही घटना जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारत नगर परिसरात घडली. मृत महिला, अंजू (वय ४०), मे २०२५ मध्ये बेपत्ता झाली होती. त्यावेळी जवाहर नगर आणि बोलारम या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र बराच काळ उलटूनही पोलिसांना या प्रकरणी कोणताही सुगावा लागला नाही.