संगारेड्डी (तेलंगणा) : हैदराबादजवळील संगारेड्डी जिल्ह्यातील पशामिलाराम औद्योगिक वसाहतीतील सिगाची केमिकल इंडस्ट्रीमध्ये आज (सोमवार) सकाळी भीषण स्फोट झाला. रिअॅक्टरमध्ये अचानक झालेल्या स्फोटामुळे १० कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेनंतर कारखान्यात लागलेली आग झपाट्याने पसरली, त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय.