esakal | Hyderabad floods: आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू; शहरातील जनजीवन पूर्णपणे ठप्प
sakal

बोलून बातमी शोधा

flood.

 तेलंगणा राज्यात सध्या अतिवृष्टी सुरु आहे. सगळीकडे पाणीच पाणी अशी स्थिती झाली आहे. सध्या हैद्रबादसह राज्यातील प्रमुख शहरांत आहे मोठी अतिवृष्टी होत आहे.

Hyderabad floods: आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू; शहरातील जनजीवन पूर्णपणे ठप्प

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

हैद्राबाद: तेलंगणा राज्यात सध्या अतिवृष्टी सुरु आहे. सगळीकडे पाणीच पाणी अशी स्थिती झाली आहे. सध्या हैद्रबादसह राज्यातील प्रमुख शहरांत आहे मोठी अतिवृष्टी होत आहे. कालपासून हैद्राबादमध्ये 15 लोकांना अतिवृष्टीमुळे जीव गमवावा लागला आहे. यातील बऱ्याच जणांचा जीव घरे कोसळून झाला आहे.

काही जण तर पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले आहेत. हैद्राबादमधील दमईगुडा, अट्टापुर, मुर्शिदाबाद, बदलागुडा भागात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. अतिवृष्टी झालेल्या भागात एसडीआरएफच्या टीम तैनात केल्या आहेत. 

#BoycottTanishq ट्रेंडमुळे टायटनच्या शेअर्समध्ये घसरण 

गंगणपहाडमध्ये 3 जणांचा छत कोसळून मृत्यू झाला आहे. हवामान विभागाने हैद्राबादसह तेलंगणामधील बऱ्याच शहरात हाय अलर्ट जारी केलं आहे. हैद्राबादमधील चंद्रायनगुट्टा भागात घर कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इब्राहिमपट्टनम भागात एका जुन्या घराचे छत कोसळून 40 वर्षीय महिला आणि 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. 

...आणि भाजपवाले म्हणाले, तुम्ही Dream-11 वर टीम बनवा, आपची खोचक टीका

तसेच रंगारेड्डी जिल्ह्यातील काग्णा नदीतील पाण्याची पातळीही अचानक वाढली आहे. काग्णा नदीला मोठा महापूर आला आहे. हैद्राबादमधील काही भागात मागील 24 तासांत 20 सेमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. बंगालच्या खाडीतील कमी दाबाचा पट्टा सोमवारी मोठा झाला होता. यामुळे आता भारतीय हवामान विभागाने (IMD) आंध्र प्रदेश, ओडिसा, तेलंगणा आणि इतर आसपासच्या भागातील राज्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हैदराबाद नजीकचा परिसर, अट्टापूर मेन रोड, मुशीराबाद, टोली चौकी क्षेत्र आणि दम्मीगुडासह अनेक भाग पाण्याखाली बुडाला होता. रस्त्यांवर कंबरे इतके पाणी साचले आहे. नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. राज्याच्या आपत्कालीन विभागाकडून मदत कार्य सुरु आहे.