...आणि भाजपवाले म्हणाले, तुम्ही Dream-11 वर टीम बनवा, आपची खोचक टीका

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 14 October 2020

मागील विधानसभा निवडणुकीत दिल्लीत भाजपाने मोठी ताकद लावून देखील भाजपाला 'आप'कडून सत्ता मिळवता आली नव्हती.

नवी दिल्ली: मागील विधानसभा निवडणुकीत दिल्लीत भाजपाने मोठी ताकद लावून देखील भाजपाला 'आप'कडून सत्ता मिळवता आली नव्हती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपने मागील मागील पंचवार्षिक निवडणूकीत विजय प्राप्त करून दिल्लीची सत्ता राखली आहे. भाजपा सोबत कॉंग्रेसने दिल्लीची सत्ता मिळवण्यासाठी मोठी ताकद लावली होती पण त्यामध्ये त्यांना यश आले नाही.

सध्या आप भाजपासोबत कॉंग्रेसलाही (Congress) बऱ्याच मुद्द्यावरुन झोडपताना दिसत आहे.  'आतापर्यंत कॉंग्रेस देशाला लुटत होती. त्यानंतर भाजपवाले आले आणि म्हणाले आता हे काम आम्ही करतो, तोपर्यंत तुम्ही  Dream-11 वर टीम बनवा' अशी मजेशीर टीका आपने दोन्ही पक्षांवर केली आहे.  

उत्तर प्रदेश सरकारवरही टीका-
आपने उत्तर प्रदेशातील योगी सरकारवरही जहरी टीका केली आहे. हत्या, महिला अत्याचार, आणि दलितांवरील अत्याचारात उत्तर प्रदेश राज्य पहिल्या स्थानी पोहचले आहे. सत्तेवर येण्यापुर्वी उत्तर प्रदेशाला विकसित राज्य बनवण्याचे स्वप्न दाखवले होते पण आता उत्तर प्रदेशला किम जोंग उनचा उत्तर कोरिया करून टाकला आहे.

Corona Updates: दिलासादायक! जगभरात भारताचा रिकव्हरी रेट सर्वाधिक आणि मृत्यूदरही सर्वात कमी

'पाच साल केजरीवाल' म्हणत दिल्लीतील सत्ता मिळवल्यापासून आपची ताकद दिल्लीसह उत्तर भारतात वाढताना दिसली होती. मागील लोकसभेत आपचे लोकसभेत चार खासदार निवडून आले होते. पंजाब आणि हरियानाच्या विधानसभा निवडणुकीत आपने मोठी ताकद लावून पक्षविस्तार करण्याचा प्रयत्न केला होता. 

(edited by-pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aap criticized on bjp and congress dream 11