esakal | पावसाचा थरार! अक्षरशः पाण्यात कार वाहून गेली
sakal

बोलून बातमी शोधा

hydrabad heavy rain

तेलंगणाची राजधानी हैद्राबादमध्ये झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पावसाचा थरार! अक्षरशः पाण्यात कार वाहून गेली

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

हैद्राबाद: तेलंगणाची राजधानी हैद्राबादमध्ये झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अचानक झालेल्या अतिवृष्टीने हैद्राबादमध्ये 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. हैद्राबादमधील जवळपास सगळा परिसर जलमय झाला आहे.

दमईगुडा भागात अक्षरशः एवढे पाणी साठले होते की, तिथं पाण्यात एक कार वाहून गेली आहे. त्याचा व्हिडिओही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

 या व्हिडिओत पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहामुळे रस्त्यावरून गाडी वाहून जाताना दिसत आहेत. लोकं भेदरलेल्या अवस्थेत ओरडतानाही ऐकू येत आहे. एकंदरीत ही सर्व अतिवृष्टीने निर्माण झालेली परिस्थिती भयंकर आहे. 

...आणि भाजपवाले म्हणाले, तुम्ही Dream-11 वर टीम बनवा, आपची खोचक टीका

हैद्राबादमधील दमईगुडा, अट्टापुर, मुर्शिदाबाद, बदलागुडा भागात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. अतिवृष्टी झालेल्या भागात एसडीआरएफच्या टीम तैनात केल्या आहेत. 

हवामान विभागाने हैद्राबादसह तेलंगणामधील बऱ्याच शहरात हाय अलर्ट जारी केलं आहे. हैद्राबादमधील चंद्रायनगुट्टा भागात घर कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इब्राहिमपट्टनम भागात एका जुन्या घराचे छत कोसळून 40 वर्षीय महिला आणि 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. 

Corona Updates: दिलासादायक! जगभरात भारताचा रिकव्हरी रेट सर्वाधिक आणि मृत्यूदरही सर्वात कमी

हैद्राबादमधील काही भागात मागील 24 तासांत 20 सेमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. बंगालच्या खाडीतील कमी दाबाचा पट्टा सोमवारी मोठा झाला होता. यामुळे आता भारतीय हवामान विभागाने (IMD) आंध्र प्रदेश, ओडिसा, तेलंगणा आणि इतर आसपासच्या भागातील राज्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

(edited by- pramod sarawale)