Hyderabad Honour Killing : ''तुझ्यासाठी मरायला तयार आहे'', पतीचे शब्द आठवून पत्नीने फोडला हंबरडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hyderabad Honour Killing

''मी तुझ्यासाठी मरायला तयार आहे'', पतीचे शब्द आठवून पत्नीने फोडला हंबरडा

हैदराबाद : ''मी तुझ्यासोबत जगणार आणि तुझ्यासोबतच मरणार. तुझ्या भावांनी मला मारण्याचा प्रयत्न केला तरी मी तुझ्यासाठी मरायला तयार आहे.'' हे शब्द आहेत हैदराबाद ऑनर किलिंगच्या (Hyderabad Honour Killing) प्रकरणात मारल्या गेलेल्या २५ वर्षाय नागराजूचे. त्याची पत्नी सय्यद अश्रीन सुलताना उर्फ ​​पल्लवी त्याच्या आठवणी सांगत हुंदका देत माध्यमांसोबत बोलत होती.

हेही वाचा: लग्नाच्या दोन महिन्यानंतर तरुणाची हत्या, ऑनर किलींगचा संशय

आमच्या लग्नाच्या काही महिन्यांपूर्वी त्याला दुसऱ्यासोबत लग्न करण्यास सांगितले होते. त्याला पटवून देण्याचा प्रयत्न देखील केला. कारण माझ्यामुळे त्याच्या जीवाला धोका होता. आमच्या प्रेमसंबंधाबाबत कुटुंबीयांना माहिती मिळाली त्यावेळी माझ्या भावांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. माझे भाऊ खूप कट्टरवादी आहेत. आपण लग्न केल्यास तुला किंवा मला मारून टाकतील, असं मी त्याला सांगितलं होतं. पण, तो माझ्यासाठी जगायला आणि मरायलाही तयार होता, असं पल्लवी इंडिया टुडेसोबत बोलताना म्हणाली.

गुंड माझ्या पतीवर चाकूने हल्ला करत होते. १५-२० मिनिट हल्ला सुरूच होता. मी लोकांना मदत मागितली. पण, सर्वजण फोनमध्ये रेकॉर्ड करत होते. कोणीही माझ्या मदतीला धावून आलं नाही. तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी मदत केली असती तर आज माझे पती जीवंत असते. ही फक्त आमची गोष्ट नाही. जगात कुठेही असा गुन्हा घडत असेल तर लोकांनी मदत करायला पाहिजे, असंही पल्लवी म्हणाली.

वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे केली हत्या -

नागराजू आणि अश्रीन सुलताना उर्फ पल्लवी यांचं महाविद्यालयात शिकत होते तेव्हापासून एकमेकांवर प्रेम होतं. त्यांनी दोन महिन्यांपूर्वी कुटुंबीयांच्या इच्छेविरोधात लग्न केले. पण, दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने त्यांच्या लग्नाला प्रचंड विरोध झाला. नागराजू (25)ची बुधवारी रात्री नऊच्या सुमारास सरूरनगर तहसीलदार कार्यालयात वार करून हत्या करण्यात आली. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी पोलिसांनी पल्लवीच्या माहेरच्या लोकांना ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

Web Title: Hyderabad Honour Killing Nagaraju Wife Recalls His Words

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimeHyderabad
go to top