
लग्नाच्या दोन महिन्यानंतर तरुणाची हत्या, ऑनर किलींगचा संशय
हैदराबाद : लग्नाच्या दोन महिन्यानंतर एका तरुणाची चाकूने वार (Crime) करून हत्या करण्यात आली. पत्नीच्या कुटुंबीयांनी हत्या केल्याचा आरोप असून हा ऑनर किलींगचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना आहे. हैदराबादेत (Hyderbad) ही घटना घडली असून याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा: सामूहिक बलात्कार पीडितेवर पोलिस ठाण्यातच पुन्हा बलात्कार, अधिकारी निलंबित
बिल्लापुरम नागराजू (२५) असे मृत तरुणाचे नाव असून तो सिकंदराबाद येथील मरेडपल्ली येथील रहिवासी होता. तो जुन्या शहरातील मलकपेट येथील एका लोकप्रिय कार शोरूममध्ये सेल्समन म्हणून काम करत होता. महाविद्यालयात शिक्षण घेताना त्याची आणि अश्रीन सुलताना दोघांची भेट झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. नागराजू नोकरीवर लागल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपूर्व नागराजू आणि अश्रीना (उर्फ पल्लवी) यांचा आर्य समाज मंदिरात विवाह पार पडला. पण, लग्नाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध असल्याचं बोललं जात आहे.
हैदराबादेतील सरूरनगर तहसील कार्यालयात दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नागराजूची हत्या केली. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला. अनेक नागरिकांनी ही घटना त्यांच्या फोनमध्ये रेकॉर्ड केली. त्यानंतर घटनेचा व्हिडिओ व्हायरल देखील झाला. त्यानंतर नागराजूच्या कुटुंबीयांना माझ्या मुलाला न्याय द्या, अशई मागणी करत निदर्शने केली. तसेच या हत्येमागे त्याच्या पत्नीच्या कुटुंबीयांचा हात असल्याचा आरोप केला. दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याचे हत्या करण्यात आली, असा आरोप एका नातेवाईकानं केला. त्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. प्रेमविवाहातूनच हत्या झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. पण आम्ही अधिक चौकशी करत असल्याचं सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीधर रेड्डी यांनी सांगितले.
Web Title: Man Killed Suspected Hounr Killing Case Hyderabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..