
Landlord Hides Camera in Woman Tenant’s Bathroom
esakal
घरमालकाने चक्क महिला भाडेकरूच्या बाथरूमच्या ब्लबमध्ये कॅमेरा लपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हैदराबादच्या वेगलराव नगर भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी आता घरमालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच ज्या इलेट्रीशनने हा कॅमेरा फिट केला, त्याचा शोधदेखील घेतला जातो आहे. अशोक यादव असं आरोपी घरमालकाचं नाव आहे. भाडेकरुच्या पत्नीला आंघोळ करताना बघता यावं म्हणून हा कॅमेरा लावल्याचं पुढे आलं आहे.