वकिल पिता-पुत्रांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

वृत्तसंस्था
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

हैदराबाद : येथील वकिल पिता-पुत्रांनी अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

हैदराबाद : येथील वकिल पिता-पुत्रांनी अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

हैदराबादमधील ग्रीनहिल्स कॉलनीमधील चैतन्यपुरी परिसरात रेड्डी यांचे कुटुंब राहते. या कुटुंबाने सहा महिन्यापूर्वी घरगुती कामासाठी एक अल्पवयीन मुलगी आणली होती. तिला हैदराबादपासून 140 किलोमीटर अंतरावरील सूर्यपेठ येथून आणण्यात आले होते. तिला दररोज मारहाण करण्यात येत होती. तसेच तिला फोन वापरण्यास बंदी घालण्यात आली होती. रेड्डी कुटुंबातील सुधाकर रेड्डी (वय 60) आणि त्याचा पुत्र भारतकुमार रेड्डी (वय 30) हे वकिल पिता-पुत्र मुलीवर अत्याचार करत असल्याचा संशय आल्याने शेजाऱ्यांनी काही कार्यकर्त्यांकडे त्यांची तक्रार केली.

विशेष म्हणजे ज्या घरात त्या मुलीला ठेवण्यात आले होते, तेथेच रेड्डीची पत्नी आणि मुलगीही निवास करत होती. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. रेड्डीच्या तारक राम रेड्डी या मुलावरही अत्याचाराचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान पीडित मुलगी गर्भवती असल्याचे आढळून आले आहे.

Web Title: Hyderabad Lawyers, Father And Son, Accused Of Repeatedly Raping Teen Help