Pothole Asana Protest in Hyderabad : देशभरातील शहरात सध्या रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्यांमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अशातच हैदराबादमध्ये रस्त्यांवरील खड्यांविरोधात एका तरुणाने अनोखं आंदोलन केलं आहे. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. विशेष म्हणजे तरुणांच्या आंदोलनाचा व्हिडीओ व्हायरल होताच, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही अवघ्या ६ तासांत हे खड्डे बुजवले. त्यामुळे तरुणाच्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरु आहे.