
हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरण : एमआयएम आमदाराच्या मुलगाही आरोपी
नवी दिल्ली : हैदराबाद (Hyderabad) सामूहिक बलात्कार (mass atrocity case) प्रकरणात एमआयएमच्या आमदाराच्या अल्पवयीन मुलालाही आरोपी करण्यात आले आहे. हैदराबादच्या जुबली हिल्स परिसरात पार्टीनंतर घरी परतणाऱ्या १७ वर्षीय तरुणीवर २८ मे रोजी सहा तरुणांनी सामूहिक बलात्कार केला होता. आरोपी मुलांचे राजकीय घराण्याशी संबंध आहेत. सहाही आरोपींपैकी एक प्रौढ आणि पाच अल्पवयीन आहेत. (MIM MLAs son was also charged)
अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात (mass atrocity case) व्हिडिओ क्लिप आणि काही छायाचित्रे समोर आली होती. ज्यामध्ये एमआयएम आमदाराचा मुलगाही घटनास्थळी दिसला होता. व्हिडिओ क्लिप आणि छायाचित्रे भाजपच्या एका आमदाराने शेअर केली होती. एमआयएम (MIM) आमदाराचा मुलगा घटनेच्या वेळी उपस्थित होता. या नेत्याने दावा केला की, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाले, त्यात आमदाराचा मुलगाही सहभागी होता.
हेही वाचा: महागाई : जागतिक बँकेने भारताचा आर्थिक विकास दर कमी केला
व्हिडिओ क्लिप आणि छायाचित्रांमध्ये एमआयएम आमदाराच्या मुलासह काही तरुण दिसत होते. पोलिसांच्या कारवाईत दिरंगाईचा आरोप करताना भाजप (BJP) आमदार रघुनंदन राव यांनी आमदार मुलाचे नाव आरोपी म्हणून का घेतले नाही, असे विचारले होते. एनडीटीव्हीला पाठवलेल्या व्हिडिओची आणि चित्रांची पुष्टी करीत नाही.
Web Title: Hyderabad Mass Atrocity Case Mim Mlas Son Was Also Charged
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..