Hyderabad Crime News : हैदराबादमधील कुकटपल्ली परिसरात घडलेल्या १० वर्षांच्या सहस्राच्या खुनाचा तपास पोलिसांनी (Police) उलगडला आहे. १८ ऑगस्ट रोजी अल्पवयीन आरोपीने घरफोडी करताना चोरी उघड झाल्याने निर्दयीपणे चाकूने वार करून मुलीचा खून केला. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी दहावीत शिकणारा विद्यार्थी असून त्याने हा संपूर्ण गुन्हा आधीच कागदावर आखलेला होता.